(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Voter Card : मतदार यादीत आधार क्रमांक जोडणीसाठी गडकरी, फडणवीस यांचे अर्ज
मतदार यादीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी नावे असणे आदी रोखण्यासाठी आधार क्रमांक आणि मतदार यादी लिंक करण्यात येत आहे. सर्व मतदारांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : मतदार यादीत आधार क्रमांक जोडून लोकशाही यंत्रणा अधिक बळकट, सुटसुटीत व नेमकी करण्याच्या अभियानास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी या अभियानाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी आर.विमला यांनी हे अर्ज स्वीकारले. सर्व नागरिकांनी या ऐच्छिक अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन गडकरी व कुटुंबातील सदस्य तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, यांनी नमुना 6 ब अर्ज भरून जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडे सादर केला. आज दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार यादीस आधार क्रमांक जोडणी मोहीम नागपूर जिल्ह्यात सुरू झाली. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल सारंग, मतदार नोंदणी अधिकारी हेमा बडे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी चैताली सावंत उपस्थित होते. मतदार यादीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी नावे असणे व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. मतदार यादीची स्वच्छता मोहीम या माध्यमातून राबवण्यात येत आहे.सर्व मतदारांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
MPSC : गट अ आणि गट ब वर्गासाठी संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा वर्णनात्मक; एमपीएसचीचे परिपत्रक जारी
व्यक्ती स्वातंत्र्य सन्मानित करतांना कर्तव्याचे भान ठेवा : आर. विमला
नागपूर: प्रशासनाने जिल्ह्यात शाळांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हर घर तिरंगा उपक्रमाचे महत्व पटवून देण्यासाठी मोहिम हाती घेतली असून याद्वारे भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे. तिरंगा डौलाने फडकणे म्हणजे काय? त्यासाठी केलेला त्याग व त्यामागचा इतिहास कळावा, यासाठी अमृत महोत्सवी वर्षांमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी तथा अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने 75 अधिकारी 75शाळांना भेटी देवून घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. या संबोधनाने उत्साहाचे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. व्यक्ती स्वातंत्र सन्मानित करतांना कर्तव्याचे भान ठेवण्याचा हा आत्मिक हेतू असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज मार्गदर्शन करतांना सांगितले. वायूसेना नगर, सेमिनरी हिल्स केंद्रीय विद्यालयात आयोजित हर घर तिरंगा कार्यक्रमात त्याबोलत होत्या. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अरविंद कुमार, उपजिल्हाधिकारी शुभांगी फुटाणे, उपशिक्षणाधिकारी भास्कर झोडे, सचिदानंद मिश्रा यावेळी उपस्थित होते.