एक्स्प्लोर

Anti Naxal Operation: दंडकारण्यात नक्षलवाद्यांच्या विरोधातील फास अधिक घट्ट; अनेक आव्हानांची पराकाष्ठा करत सुरक्षा दलाचा सावध पवित्रा

करेगुट्टाच्या अनेक किलोमीटरच्या वन क्षेत्रातून हळू हळू सुरक्षा दल एक एक पाऊल समोर जात आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरलेले भू-सुरंग आणि स्फोटके सुरक्षा दलांसमोर मोठ्या अडचणी निर्माण करत आहे.

Anti Naxal Operation In Chhattisgarh : देशाच्या एका बाजूला दहशतवाद  (Naxal) विरोधातला सर्वात मोठं ऑपरेशन सध्या सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दंडकारण्यातील छत्तीसगड - तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद विरोधातलं आजवरचं देशातलं सर्वात मोठं ऑपरेशन  (Naxal Encounter) राबवलं जात आहे. करेगुट्टाच्या डोंगराळ भागात सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीसांचे STF आणि DRG तसेच तेलंगाना पोलिसांच्या ग्रे हाऊंड्स तुकड्यांतील एकूण 7 हजार पेक्षा जास्त जवानांनी 500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना (Naxalites) गेल्या आठवड्याभरापासून घेरून ठेवले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील करेगुट्टा डोंगराच्या अवतीभवती सुरक्षा दल हळुहळू त्यांचा फास घट्ट करत आहे.

डोंगराच्या अवतीभवतीच्या अनेक किलोमीटरच्या वन क्षेत्रातून हळू हळू सुरक्षा दल एक एक पाऊल समोर जात आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरलेले भू-सुरंग आणि स्फोटके सुरक्षा दलांसमोर मोठ्या अडचणी निर्माण करत आहे. जवानांना नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पेरून ठेवलेल्या भूसुरुंग पासून स्वत:ला वाचवत एक एक पाऊल टाकावा लागत आहे. नक्षलवाद्यांनी जंगलात चालण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पायवाटवर अनेक ठिकाणी स्फोटके पेरून ठेवल्याचे आता उघड होत आहे.

नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी जमिनीत पेरले भू-सुरंग अन् स्फोटके

समोरुन येणाऱ्या सुरक्षा दलातील जवानांना जास्तीत जास्त नुकसान व्हावा, म्हणून बिअरच्या बॉटलमध्ये स्फोटक भरून जवानांना जखमी करण्याचे नियोजन नक्षलींनी केल्याचे दिसून येत आहे. अशातच काल (28 एप्रिल) करेगुट्टा डोंगराच्या आजूबाजूच्या अनेक किलोमीटरच्या परिसरात अनेक ठिकाणी सुरक्षा दलातील जवानांना अशाच पद्धतीने काचेच्या बॉटलमध्ये स्फोटके भरून ते जमिनीत पुरल्याचे आणि त्याला वायरद्वारे जोडून स्फोटकांचे सापळे तयार केल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षा दलातील जवान डोंगरावर मोक्याच्या ठिकाणी शस्त्रांसह बसलेले नक्षलवादी आणि जमिनीत पायाखाली स्फोटके अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत समोर जात आहेत.

500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांसह मोठ्या कमांडर्सला घेरलं

करेगुट्टाच्या डोंगराच्या या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना अद्याप फारसं यश मिळालं नसलं, तरी या ठिकाणी सुरक्षा दलाने 500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांसह त्यांच्या सर्व मोठ्या कमांडर्सला घेरले आहे. या घेराबंदीचा काय महत्व आहे हे ओळखूनच सुरक्षा दल गेले पाच दिवस 44 - 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सातत्याने धैर्य ठेवून करेगुट्टाच्या डोंगराला घेरा घालून थांबले आहे. अधून-मधून गोळीबार सुरू आहे. जर या ऑपरेशनच्या माध्यमातून सुरक्षा दल हिडमा आणि देवाला नामोहरम करण्यात किंवा अटक करण्यात यशस्वी ठरले, तर फक्त छत्तीसगडच नाही तर भारतातील नक्षलवादावर सुरक्षा दलांचे हे आजवरचा सर्वात मोठा आघात मानला जाईल.

हे ही वाचा 

 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget