Amravati News : MIDC तर्फे PM मित्र पार्कचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थित
Amravati News : महाराष्ट्र सरकारच्या वतीने अमरावतीमध्ये PM मित्र पार्कचं लोकार्पण करण्यात आलं आहे.
PM Mitra Textile Park : महाराष्ट्र सरकारच्या वतीने अमरावतीमध्ये पीएम मित्र पार्क (PM Mitra Park) चं लोकार्पण करण्यात आलं आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अमरावतीमध्ये PM मित्र पार्कचं लोकार्पण करण्यात आलं आहे. रविवारी मुंबईत ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
अमरावतीमध्ये PM मित्र पार्कचं लोकार्पण
रविवारी मुंबईत पार पडलेल्या पीएम मित्र पार्कच्या औपचारिक लोकार्पण कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात 1320 कोटी रुपयांचे सामंजस्य करारही करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थित
महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती येथे महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (PM MITRA) पार्क उभारण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्यामुळे 300,000 व्यक्तींसाठी रोजगार निर्माण होईल, असा सरकारचा दावा आहे. रविवारी अमरावतीमधील पीएम मित्र पार्क औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिष्ठित PM मित्र पार्क उभारल्याबद्दल महाराष्ट्राचं सरकारचं अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्र जिस प्रकार से तेज गति से प्रगति कर रहा है, उसमें PM Mitra पार्क से और अधिक बल मिलेगा।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 16, 2023
अमरावती में बनने वाले #PragatiKaPMMitra पार्क के शुभारंभ कार्यक्रम को संबोधित किया। pic.twitter.com/bEeYYIBe8R
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, फार्म - फायबर - फॅक्टरी - फॅशन - फॉरेन या संपूर्ण टेक्सटाईल व्हॅल्यू चेनमध्ये महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान पाहता, टेक्सटाईल पार्कसाठी ही उत्तम निवड आहे. अमरावतीमधील रस्ते, रेल्वे, बंदर आणि विमानतळ नेटवर्कसह चांगल्या प्रकारे जोडलेल्या पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला लक्षणीय चालना मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह आणि महाराष्ट्राचे प्रधान सचिव (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे हे उपस्थित होते.