(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari On Sharad Pawar : ... म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुतीसुमने
Nitin Gadkari On Sharad Pawar : गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले.
Nitin Gadkari On Sharad Pawar : विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या (Dr. Panjabrao Deshmukh) नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयाचे नाणे जारी केले. त्या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
पवारांच्या उंचीची माणसं पुरस्कारासाठी कशी मिळणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
राजकीय धुळवडीत सामान्यांच्या लक्षात काम राहते
गडकरी यांनी म्हटले की, पंजाबरावांची तळमळ, व्हिजन ही शरद पवार यांच्याकडे आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे नेतृत्व शरद पवार
राजकारणाचा अर्थ दुर्देवाने सत्ताकारण असा करण्यात आला आहे. राजकारण म्हणजे राष्ट्राकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे, असे समजून कृषी क्षेत्रासाठी, शिक्षण, सांस्कृतिक कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढले
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भविष्याचा विचार केला
आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची महती सांगत सध्याच्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे एक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि दुसरे कृषी क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक हे भविष्याच्या नागरिकांकरता निर्माण करण्याकरता होणारी भांडवली आणि शिक्षणातून संस्कारीत झालेला माणूस ज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण झालेला माणूस हा आर्थिक व्यवस्थेचाही करणार असतो. शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचावं शैक्षणिक मूल्यांच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृती आर्थिकदृष्ट्या समाजामध्ये स्वयंपूर्ण व्हावा ही संकल्पना या विचाराच्या मागे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातल्या अनेक गावांमध्ये शिक्षण संस्थांचे जाळ निर्माण केलं.
मोठ्या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे.. यात ग्रामीण भागाचे लोकं आता शहराकडे स्थलांतरीत होत आहेत. विकासाचे मूल्यमापन हे शेतीतून किती आणि इतर क्षेत्रामधून किती हे पाहून होते. गावातील शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, या भावनेतून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्यावेळी कार्य केलं असल्याचे गडकरी यांनी म्हटले. शेती प्रगत नव्हती तेव्हा डॉ पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खूप कार्य केले. राजकारणी माणूस हा पाच वर्षांचा विचार करतो पण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भविष्याचा विचार केला. आपला शेतकरी आता ऊर्जादाता झाला आहे. शेतकरी आता डांबर पण तयार करत असल्याचे गडकरी यांनी म्हटले.