उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच; NIA चा आरोपपत्रात दावा
Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं असून उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच करण्यात आल्याचा दावाही केला आहे.
Umesh Kolhe Murder Case: अमरावतीतील (Amravati News) केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच झाल्याचा दावा एनआयएनं (NIA) आपल्या आरोपपत्रातून केला आहे. कट्टरपंथीय लोकांच्या टोळीनं केलेली ही हत्या हे एक दहशतवादी कृत्य असल्याचं एनआयएनं आपल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय एकात्मता बिघडली. केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य जनतेची सुरक्षा देखील धोक्यात आल्याचा दावा तपासयंत्रणा एनआयएनं केला आहे.
उमेश कोल्हे हत्याकांडात (Umesh Kolhe Murder Case) एनआयएनं गेल्या आठवड्यातं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. या 137 पानी आरोपपत्रात एकूण 11 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत. अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्याच्या रागातूनच उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी केल्याचा आरोप एनआयएनं लावला आहे. सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. 21 जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री साडेदहाच्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर 11 जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ मागितली होती.
प्रकरण नेमकं काय?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. 21 जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलनं घरी परतत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास चाकूनं वार करून त्यांची हत्या करण्यात आली. प्राथमिक चौकशीतून पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात केली होती. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य पाहता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. हा खटल्याची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील अकरावा आरोपी शहिम अहमद NIA ला शरण