Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील अकरावा आरोपी शहिम अहमद NIA ला शरण, तीन महिन्यापासून होता फरार
Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील फरार आरोपी शहिम अहमद याच्यावर एनआयएने (NIA) दोन लाखाच बक्षीस जाहीर केले होते
मुंबई : अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील (Umesh Kolhe Murder Case) 11 वा फरार आरोपी शाहीम अहमदने एनआयएला (NIA) शरण आला आहे. तीन महिन्यापासून शमीम अहमद फरार होता. घाबरल्यामुळे शाहीम अहमद तपासयंत्रणेसमोर आला नाही, ही माहिती स्वत: शाहीम अहमदने एबीपी माझाला दिली आहे.
तपासयंत्रणेला शरण आलेल्या शाहीम अहमद याच्यावर एनआयएने दोन लाखाच बक्षीस जाहीर केले होते. शरण आल्यानंतर शाहीम अहमदला मुंबईतील एनआईए न्यायालयात घेऊन गेली. त्याअगोदर शाहिमने ABP न्यूजला सांगितले की, मी घाबरलो होतो त्यामुळे इतके दिवस तपासयंत्रणांसमोर आलो नाही. मी फक्त दोन आरोपींना ओळखतो. जेव्हा हत्या झाली त्यावेळी गॅरेजमध्ये होतो.
आरोपी शमीम अहमद हा उमेश कोल्हे हत्याकांडच्या कटामध्ये सहभागी होता. तसंच उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्य आरोपी असलेला इरफान खानच्या खाजगी वाहनावर शाहीम अहमद हा चालक होता. उमेश कोल्हे हत्येमध्ये नेमका शाहीम अहमद याचा काय सहभाग होता? तो इतके दिवस फरार का होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासानंतर मिळणार आहे.
शाहीम अहमद आज स्वत: न्यायालयात शरण आला होता. मात्र तो सरेंडर करण्यासाठी आला असताना शरण होण्याची प्रक्रिया होण्यापूर्वीच NIA नं शहिम अहमद याला मुंबई सत्र न्यायालय परिसरातून केली अटक केली. उद्या शहिमला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. 21 जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलनं घरी परतत असताना रात्री साडे 10 च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. प्राथमिक चौकशीतून पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात केली होती. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य पाहता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. हा खटल्याची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
संबंधित बातम्या :