एक्स्प्लोर

Maharashtra Politics: 'वर्षा' सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

Maharashtra Politics : शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Maharashtra Politics : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका आहे. वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं यांनी सोंग केलं असल्याचे टीकास्त्र  भुमरे यांनी सोडले. शिंदे गटाच्या 'हिंदू गर्व गर्जना यात्रा' निमित्त अमरावतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकरदेखील (Arjun Khotkar) उपस्थित होते. 

शिंदे गटाच्या 'हिंदू गर्व गर्जना यात्रा' निमित्त अमरावती जिल्ह्यामध्ये संघटनात्मक मार्गदर्शन भुमरे आणि खोतकर यांनी केले. अमरावती शहरातील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या हॉलमध्ये हा मेळावा पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

भुमरे यांनी उद्धव ठाकरे  आणि इतर नेत्यांवर टीका करताना म्हटले, मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत. कोणत्याच फाइलवर सही न करण्यास हे गोचीड सांगत होते. सही केली तर अडचणीत याल, असेही सांगत होते. त्यांच्यामुळे कोणाचेच काम झाले नाही असा आरोपही भुमेर यांनी केला. 

नवरीप्रमाणे वर्षा बंगला सोडला...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी सूरत गाठले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत देताना वर्षा बंगला सोडत असल्याचे सांगितले होते. शिंदे गटाने चर्चेसाठी मुंबईत यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडला. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयावरही भुमरे यांनी जोरदार टीका केली. वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असल्याची बोचरी टीका भुमरे यांनी केली. 

मास्क गेला, खुर्चीही गेली...

संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातील मास्क वापराबाबतही टीका केली. आम्ही उद्धव यांना भेटण्यासाठी जायचो तेव्हा मास्क वापरायचे. आता, सरकार गेले तेव्हा मास्कही गेला, कोरोनाही गेा आणि कोरोनाही गेला असल्याची टीका भुमरे यांनी केली. वांद्रे-कुर्ला संकुलावर आपला दसरा मेळावा होणार असून कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget