एक्स्प्लोर

Amravati Crime News: पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या; प्रियकराला सिलिंडर आणायला लावलं अन् वादाला तोंड फुटलं, पुढे भयानक घडलं, अमरावती हादरली!

Amravati Crime News: आरोपी मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

पथ्रोट : अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला जिवानिशी ठार करण्यात आलं. पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास खुनाची ही संतापजनक घटना घडली आहे. अरविंद नजीर सुरत्ने (37, रा. गरजदरी, ह.मु. पथ्रोट) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी 3 सप्टेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

मृताचा मोठा भाऊ अशोक यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मारेकरी अमित लवकुश मिश्रा (33, रा. पथ्रोट) याच्यासह 38 वर्षीय महिलेला अटक करून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. दोघांनाही एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यवसायाने चालक असलेल्या अरविंदचा प्रेमविवाह झाला होता. तो पत्नी व दोन मुलांसमवेत झेंडा चौक परिसरात भाड्याने राहत होता. 2 सप्टेंबर रोजी रात्री 11:45 च्या सुमारास फिर्यादी अशोक हे परतवाडा येथे असताना त्यांना भाचा अनिलने फोन केला. अरविंद मामा व मामी यांच्यात अमित मिश्रा याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे कडाक्याचा वाद झाला आणि यातूनच खून झाल्याचे अनिलने फोनवरून सांगितले. त्या दोघांनीच अरविंदला मारून टाकल्याचे अशोक सुरत्ने यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. लाकडी राफ्टरने अरविंदच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रात्री झालेलं कडाक्याचं भांडण

अरविंद यांना 7 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले होते. त्यावेळी पत्नीच्या प्रियकराने म्हणजेत आरोपी अमितने ते भरून आणले होते. ती गोष्टी अरविंद यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी प्रियकर अरविंदच्या घरी पोहोचला.  दोघांनी मिळून अरविंदचा खून केला. अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने देखील पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. पती पत्नीत आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरवरून वाद सुरू झाला होता. मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. तर, महिलेला बुधवारी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget