Agriculture News : अमरावतीत अनधिकृत कापसाच्या बोगस बियाणांची विक्री, नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक जण ताब्यात
Agriculture News : अमरावतीत रात्री अनधिकृत कापसाचे एचटीबीटी बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कृषी विभागानं कारवाई केली आहे.
Agriculture News : अमरावतीत रात्री अनधिकृत कापसाचे एचटीबीटी बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कृषी विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलीसांची संयुक्त कारवाई केली आहे. अशोक भाटे असं कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्रीच्या संदर्भात कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
अमरावती येथील अशोक भाटे हा एजंट त्याच्या महिंद्रा के यु व्ही या वाहनामध्ये कपाशीचे एचटीबीटी बोगस बियाणे गावागावात विक्री करत आहे. सायंकाळी तो बियाणे विक्री करण्यासाठी अमरावती येथील सुरुची इन बार पोटे रोडवर येत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याआधारे कृषी विभागाने गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. आरोपीरडून एकूण 422 पाकीट बोगस बियाणे अंदाजे 4 लाख रुपयांचे बियाणांसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वर्धा बोगस बियाणे प्रकरण
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास लावला आहे. याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन दहा आरोपींना अटक केली होती.
तपास करण्यासाठी SIT ची स्थापना
याप्रकरणी तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी एस आय टी स्थापन केली आहे. यामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 जणांटी टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे. दररोज तपासातील 24 तासातील अपडेट पोलीस अधीक्षकांना द्यावे लागणार आहेत. विविध पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे. बोगस बियाणे प्रकरणाची पाळेमुळे खोलवर आहेत. आत्तापर्यंत मुख्य सुत्रधारासह 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशाची बॉर्डर असे परराज्याचे कनेक्शन या प्रकरणाशी जुडले असल्याची सुत्रांची माहिती आहे. विविध 14 नामांकित कापूस बियाणे कंपनीचे बनावट पॅकेट तयार करण्यात आले होते. 1 लाख 18 हजार 13 बनावट पॅकेट पोलिसांनी जप्त केले आहे. एस आय टी च्या सखोल तपासातून आणखी खुलासे होऊन बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: