एक्स्प्लोर

Amol Mitkari: "मृत्यूच्या आधी तो नेमका कोणासोबत...", जय मालोकरच्या मृत्यूच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

MNS Activist Jay Malokar Death Case : 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती.

अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं या अहवालात उघड झालं आहे. 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय त्याला द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे.या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. 

मी जर दोषी असेल, माझे कार्यकर्ते दोषी असतील तर आम्हाला फासावर द्या, ह्यात राजकारण करायचं नाही आणि कोणी करूही नका. मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता. त्याला कुठे-कुठे नेण्यात आलं या सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय द्या. ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशीच मी म्हटलं होतं की, सविस्तर चौकशी करायला हवी. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं असंही अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात?

जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. 
छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. 
डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. 
मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा
या सर्व गोष्टींमुळे 'न्यूरोजनिक शॉक'मुळे मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray :  मी माहीममधून लढणारच, राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही,Ajit Pawar Vidhansabha : बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिलीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 02 November 2024Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Embed widget