Chitra Wagh on Sanjay Rathod : संजय राठोडांविरोधातील माझा लढा अजून संपलेला नाही; चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या
Chitra Wagh : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सटर-पटर आरोपांवर उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. राज्यात सध्या एक मोठ्या ताई आणि दुसऱ्या सटर-फटर ताई काहीतरी बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
Chitra Wagh - Akola : राज्यातील शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधातील आपला लढा अद्यापही संपलेला नसल्याचे भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासंदर्भात दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयातील याचिका आजही तशीच आहेत. ती आपण कधीही मागे घेणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. अकोला येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. चित्रा वाघ म्हणाल्या, तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने संजय राठोड यांना क्लीन चीट का दिलीय? याचा जाब उद्धव ठाकरेंनाच विचारा असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय. त्यामुळे संजय राठोड यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदे गटाला अडचणीत आणतोय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मला या घटनेबद्दल फारशी माहिती नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. वैयक्तिक चित्रा वाघ म्हणून या घटनेचं दुःख वाटतं असं व्हायला नको होते, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणी व्यक्त केली आहे.
'सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर उत्तर द्यायला बांधील नाही'
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सटर-पटर आरोपांवर उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. राज्यात सध्या एक मोठ्या ताई आणि दुसऱ्या सटर-फटर ताई काहीतरी बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही पक्षात नवीन असाल तर माहिती घ्या. आरोप करताना तुमच्या सरकारने काय केलंय याची माहितीही घ्या. महिलांच्या गाड्या वापरणारे तुमचे आघाडी सरकार होते, असा आरोपही वाघ यांनी केला.
संजय राठोड यांच्याविरोधातील लढा सुरुच
मंत्री संजय राठोड विरोधातला माझा लढा आजही सुरूच आहे. यासंदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आजही तशीच आहे आणि मी ती मागे घेणार नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना या संजय राठोड यांना तेव्हाच्या राज्य सरकारने 'क्लीन चिट' का दिली होतीय? माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारावे की त्यांनी कोणत्या आधारावर संजय राठोड यांना 'क्लीन चिट'दिली.
इतर महत्वाच्या बातम्या