महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी कपिल ढोके यांची नियुक्ती
Akola: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांच्या आज विविध जबाबदाऱ्यांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Akola: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांच्या आज विविध जबाबदाऱ्यांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवक काँग्रेसचे राज्याचे महासचिव कपिल ढोके यांना प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कपिल ढोके हे अकोल्याचे रहिवाशी आहेत. कपिल ढोके यांची राज्यभरात उत्कृष्ठ वक्ता म्हणून ओळख आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी मिथेंद्र दर्शनसिंग आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी आज प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या विविध जबाबदाऱ्यांवर नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये युवक काँग्रेसचे ध्येय धोरणे माध्यमांसमोर मांडण्यासाठी कपिल ढोके यांना मुख्य प्रवक्ता म्हणून संधी देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील कुटासा या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील कपिल ढोके यांचा युवक काँग्रेसमधील प्रवासाचा आलेख हा नेहमीच चढता राहीलेला आहे. यापुर्वी ते प्रवक्ता म्हणुन कार्यरत होते. सहा महीन्यांपुर्वी झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत ते प्रदेश महासचिव म्हणून निवडून आले होते. आणीटि आता संपुर्ण राज्यामधे मुख्य प्रवक्ता म्हणून ते संघटनेत कार्यरत असतील. सोबतच कपिल ढोके प्रदेश काँग्रेस कमिटीचे 'मिडीया पॅनलिस्ट' म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळत आहेत.
"आगामी काळात नेतृत्वाने टाकलेल्या जबाबदारीला न्याय देत संपूर्ण राज्यामधे युवक काँग्रेसची भुमिका शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल", अशी प्रतिक्रिया कपिल ढोके यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना व्यक्त केली आहे. ढोके यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या मुख्यप्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोण आहेत कपिल ढोके?
- अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या कुटासा गावातील शेतकरी कुटूंबात जन्म.
- अवघ्या विशीत कपिल यांची राज्यभरात वादळी वक्ते अशी ओळख.
- 'संभाजी ब्रिगेड'च्या माध्यमातून सार्वजनिक जिवनात प्रवेश. व्याख्यानासाठी राज्यासह बाहेरच्या राज्यांमध्येही प्रवास.
- गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय. युवक काँग्रेसमध्ये प्रवक्ता, प्रदेश सरचिटणीस, मीडिया पॅनेलचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्यांवरील कार्य.
- युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या कार्यकाळात युवक काँग्रेसमध्ये उमटवला कामाचा ठसा. तांबेच्या 'गुड बूक'मध्ये समावेश.
इतर महत्वाच्या बातम्या:
ITR Filling : इन्कम टॅक्स रिटर्नचा शेवटचा दिवस, एका तासात पाच लाख प्राप्तीकर परतावे दाखल
IPO : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओसाठी पुन्हा अर्ज, इश्यूचा आकार निम्म्याहून कमी