Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगरमध्ये भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश लंके आणि रोहित पवार यांनी केला. यावरून सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
![Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले... Sujay Vikhe s response to Nilesh Lanke and Rohit Pawar s allegation Ahmednagar Lok Sabha Constituency Maharashtra Politics Marathi News Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/f3a029e0d24c74ba60e7518b6122f9a71715586756334923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा (Ahmednagar Lok Sabha Constituency) समावेश आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरमध्ये आता आरोपांच्या जोरदार फैरी सुरु झाल्या आहेत. बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार (Ahmednagar Lok Sabha Election) संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर केला. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला. यावर आता नगर दक्षिणचे महायुतीचे आमदार सुजय विखे यांनी निलेश लंके आणि रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय.
पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे (Rahul Shinde) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभा आहे तर राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की , पारनेर मधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे.
पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही
पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
सुजय विखेंचा रोहित पवारांना टोला
तसेच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले 2019 मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. आपण काय केलं ते पाहावं आणि नंतर दुसऱ्यावर टीका टिप्पणी करावी, असेही सुजय विखेंनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नगरमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार, निलेश लंकेंचा विखेंवर गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)