Sujay Vikhe Patil : भाजपचा उमेदवार फिक्स, समोरचा उमेदवार अजूनही ठरेना, सुजय विखे पाटलांचा मविआला टोला
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी तर फिक्स झालो आहे, मात्र समोरचा उमेदवार अजून देखील ठरला नाही, असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
Sujay Vikhe Patil : अहमदनगरची लोकसभा निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे. अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी तर फिक्स झालो आहे, मात्र समोरचा उमेदवार अजून देखील ठरला नाही, असा टोला खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. यावरून सुजय विखे पाटलांनी अहमदनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातून मविआला टोला लगावला आहे.
ही महायुतीची निवडणूक
सुजय विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी विखे कुटुंबातील चौथ्या पीडिला सत्तेत बसवले आहे. आमचे काहीतरी योगदान असेल म्हणूनच नागरिकांनी आम्हाला साथ दिली आहे. एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल तर हरकत नाही, मात्र ही निवडणूक महायुतीची निवडणूक आहे. अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी फिक्स आहे. मात्र समोरचा उमेदवार अजूनही ठरेना, असे त्यांनी म्हटले आहे.
काहीतरी विचार असेल म्हणूनच आमदार शिंदेंसोबत गेले असतील
ते पुढे म्हणाले की, महायुतीची निवडणूक आहे, असेच समजून सर्वांनी एकजुटीने राहावे. एक सरपंच फोडायचा असेल तर सहा-सहा महिने घालवावी लागतात इथे एकनाथ शिंदेंमागे 40-40 आमदार जातात. काहीतरी विचार असेल म्हणून तर आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले असतील, असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
अहमदनगर लोकसभेबाबत श्रीकांत शिंदेंना विश्वास
पंतप्रधान मोदींच्या कामामुळे गेल्या 10 वर्षात आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात 10 हजार कोटींची कामे केली आहेत. लोकसभेची निवडणूक ही कोणत्या एका व्यक्तीची नसून तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. सुजयच्या नावातच जय आहे. त्यामुळे सुजयचा विजय निश्चितच होणार आहे, असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला आहे.
अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके?
पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. ते अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. निलेश लंके यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला निलेश लंकेंनी हजेरी लावल्याने ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे निलेश लंकेंना आता अहमदनगर लोकसभेचे तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निलेश लंकेंना उमेदवारी जाहीर झाली तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके लढत पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा
शिंदे-फडणवीस आणि पवारांची पाऊले चालती दिल्लीकडे सुरुच, महायुतीचा तिढा सुटता सुटेना