कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सह. सा. कारखान्याने थकवले 21 कोटी, कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच पैसे थकवले आहेत. हे पैसे कारखान्याची मालमत्ता विकून देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
Karmayogi Kundlikrao Jagtap Sugar Factory : शेतकऱ्यांच्या (Farmers) ऊसाचे पैसे थकवल्याप्रकरणी श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर (Karmayogi Kundlikrao Jagtap Cooperative Sugar Factory) कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडून 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांच्या वसुली करण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्तांनी (Sugar Commissioner) कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करुन त्याची विक्री करून शेतकऱ्यांना देय रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. याशिवाय नगर जिल्ह्यातील अगस्ती, वृद्धेश्वर या सहकारी कारखान्यासह गंगामाई इंडस्ट्रिज या खासगी कारखान्यांच्या 'आरआरसी'चे प्रस्तावही आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहेत. साखर आयुक्तांनी 31 मे रोजी कुकडी कारखान्यासाठी हा आदेश दिला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यांत शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे देण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत.
कोणत्या कारखान्याकडे किती पैसे थकले?
दरम्यान, सध्या अहमदनगर जिल्ह्यातील आगस्ते कारखान्याने शेतकऱ्यांचे 13 कोटी 11 लाख 85 हजार रुपये, पाथर्डीतील वृद्धेश्वर कारखान्याने 8 कोटी 14 लाख 44 हजार रुपये तर शेवगाव मधील गंगामाई इंडस्ट्रीजने 17 कोटी 7 लाख 78 हजार रुपये थकवले आहेत. यापैकी श्रीगोंदा येथील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या 'आरआरसी'चा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक आणि आयुक्त पाठवला होता, त्यानुसार ही कारवाई होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Bidri Sakhar Karkhana : इकडं अध्यक्ष के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर अन् तिकडं 'लय भारी' बिद्री कारखान्यावर पडली धाड!