एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजप आणि एमआयएमचे 'मॅच फिक्सिंग'; संजय राऊतांकडून इम्तियाज जलीलांच्या 'त्या' वक्तव्याचा खरपूस समाचार

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी भाजप सरकारवरदेखील सडकून टीका केली आहे.

Sanjay Raut अहमदनगर : खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा एमआयएम पक्ष आणि भाजपचे अंतर्गत संगनमत असल्यामुळे भाजपने त्यांना बोलायला सांगायचे आणि त्यांनी बोलायचे. त्यानंतर भाजपनेच आंदोलन करून लोकांच्या भावना भडकवायच्या, असा प्रकार पहिल्यापासूनच सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इम्तियाज जलील आणि भाजपवर (BJP) टीका केली आहे.

सावरकर हे भगोडे होते असे वादग्रस्त वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. अहमदनगर येथे संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

अहमदनगरमधील गुंडगिरी शिवसेना संपवणार

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुंडागिरीचे राज्य चालू असून या गुंडांचे बॉस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. अहमदनगर शहरातील गुंडगिरी लवकरच शिवसेना संपवणार, असा निर्धार आम्ही केला असल्याचेदेखील संजय राऊत म्हणाले. 

सासरे-जावयांवर संजय राऊतांचे टीकास्त्र

दरम्यान, अहमदनगर येथे आज रविवारी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी संजय राऊत भाषणात म्हणाले की,  अनिल भैय्या राठोड यांच्याप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नगरमध्ये काम केलं पाहिजे. अनिल भैय्या असते तर नगर शहरातील गुंडगिरीशी संघर्ष केला असता असे सर्वजण मला सांगतात. नगरमधील ताबेमारी आणि गुंडगिरी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघेल. या शहरातील आमदार असेल की खासदार, कुणी कुणाचा व्याही असो की साडू असो सर्वांची गुंडगिरी मोडून काढू, अशी टीका त्यांनी यावेळी शिवाजी कर्डीले आणि संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता केली. शिवसेनेचा जन्मच गुंडगिरीतून झाला आहे. तुमचा "संग्राम" असेल तर आमचा "महासंग्राम" आहे. असाही टोला त्यांनी संग्राम जगताप यांना लाग्वाला. 

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

शिवसेना नसती तर नरेंद्र मोदींना अयोध्येत जाऊन पूजा करता आली असती का? शिवसैनिक-कारसेवक केवळ रेल्वे स्टेशनपर्यंत गेले नव्हते तर अयोध्येत जाऊन त्यांनी हातोडा चालवला, अशी टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

तेव्हा या माणसाला रडू आले नाही

अक्षदा वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या. राम केवळ तुमच्या बापाचा नाही आमचाही आहे. बेरोजगारीवर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. मला मोदींचं आश्चर्य वाटलं, रामाची मूर्ती पाहून मोदींना रडू आलं. पुलवामात सैनिक शहीद झाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तेव्हा या माणसाला रडू आले नाही. देवाच्या नावावर भीक काय मागता, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

शिवसेना स्थापन झाली तेव्हा 'शिंदे' गोधडीत पण नव्हते

निवडणूक आलीये 'ते' एक किलो डाळ आणि साखर वाटत आहेत. हे राजकारण आपल्याला बदलायचे आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप खासदार सुजय विखेंवर टीका केली. राहुल नार्वेकर यांना सांगून शिवसेना स्थापन केली होती का? शिवसेना कुणाची हे सर्वसामान्यांना विचारा ते सांगतील शिवसेना ठाकरेंचीच आहे म्हणून. जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा 'शिंदे' गोधडीत पण नव्हते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊतांनी डिवचले.

मोदींच्या फौजा येतील पण आम्ही लढू

नगर जिल्ह्यातून तीन ते चार आमदार निवडून आणायचेच आहेत, असा निर्धार संजय राऊतांनी केला. प्रभू श्रीराम शिवसेनेच्या पाठीशी आहेत. भाजपच्या पाठीमागे नाहीत. बजरंग बलीची गदा आपल्याकडे आहे, कोणी खूप शहाणपणा करत असेल तर तीच गदा त्यांच्या डोक्यात घालू. पुढच्यावेळी मी इकडे येईल तेव्हा इकडचे सर्वच ताबेमार बिळात जाऊन लपतील. ईडी वाले येतील, मोदींच्या फौजा येतील पण आम्ही लढू, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : "ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरुय"; छगन भुजबळांची नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget