एक्स्प्लोर

Sanjay Raut On Bihar Politics : पलटूराम फक्त नितीश कुमार नाहीत, तर...; बिहारच्या राजकारणावर संजय राऊतांचे वक्तव्य

Sanjay Raut On Bihar Politics :  नितीशकुमार यांना पुन्हा एकदा पलटूराम म्हटले जात असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फक्त नितीशकुमारच पलटूराम नाही असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut On Bihar Politics :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेणारे जनता दल युनायटेडचे  नितीशकुमार (Nitishkumar) आता बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि महाआघाडीसोबत काडीमोड घेत नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपसोबत घरोबा करणार आहे. नितीशकुमार यांना पुन्हा एकदा पलटूराम म्हटले जात असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फक्त नितीशकुमारच पलटूराम नाही असे म्हणत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 

अहमदनगर येथील वंजारवाडीत संजय राऊत आले होते. संजय राऊत यांना वंजारवाडी येथे संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत यांनी म्हटले की, पलटूराम फक्त नितीशकुमार नाहीत. तर पहिले पलटूराम भाजपा आहे. नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती. त्यामुळे खरी पलटुराम भाजपच आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

नितीशकुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची दाट शक्यता असून रविवार, 28 जानेवारीचा दिवस बिहारसाठी महत्त्वाचा असणार आहे. नितीशकुमार राजदसोबत काडीमोड घेणार असून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. एकाच पंचवार्षिकमध्ये नितीशकुमार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

भाजप ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार?

भाजप पुन्हा एकदा ठाकरेंना सोबत घेणार का, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, भाजपला काही साक्षात्कार झालाय का? आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही. काय म्हणून आम्हाला सोबत घेतील अशी उपरोधिकपणे राऊत यांनी म्हटले. बिहारच्या राजकारणात उलथापालथ होत असल्याची चर्चा सध्या होत आहे. नितीश कुमार यांना भाजप सोबत घेत असतील आणि भाजप जर जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याच्या प्रयत्न करत असेल तर शिवसेना भाजप सोबत जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मराठा आरक्षण निर्णयाचा आनंद घेऊ द्या, त्रुटीवर नंतर बोलू

मराठा आरक्षणाचा आजच निर्णय झालाय त्यांना आनंद घेऊ द्या. काही त्रुटी असतील तर नंतर बोलता येईल. मात्र राज्यातील एखादी समस्या सुटली असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
राष्ट्रवादीत घडामोडी वाढल्या, अजित पवार दिल्लीत असतानाच प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोरKurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याCabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
राष्ट्रवादीत घडामोडी वाढल्या, अजित पवार दिल्लीत असतानाच प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Embed widget