एक्स्प्लोर

मोठी बातमी! रेल्वेकडून 'अहिल्यानगर' नामांतरास ग्रीन सिग्नल; रेल्वेदेखील नवाबाचे नामोनिशाण मिटवणार

Ahmednagar News : अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला आहे. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आहे.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा ठराव महापालिकेत (Ahmadnagar Municipal Corporation) मांडण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेनंतर आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने (Union Ministry of Railways) हिरवा कंदिल दिला आहे. 

मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची  मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने नामांतराचा ठराव मंजूर केला. 

जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर

आता जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. 

अहिल्‍यानगर नावास मान्‍यता 

नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पूर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पूर्ण होत असल्‍याचेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

गोपीचंद पडळकरांनी केली होती मागणी 

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती सोहळ्यात बोलतांना देखील त्यांनी ही विनंती केली होती. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती. 

आणखी वाचा 

अहिल्यानगर नामांतरास चॅलेंज; हायकोर्टात याचिका दाखल; सुनावणीची तारीख पडली, सरकारची डोकेदुखी वाढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 03 PM : 19 September 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Ajit Pawar FaceBook Hack : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक?  शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती, नेमकं काय घडलं?
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Embed widget