एक्स्प्लोर

PM Narendra Modi : 'चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स', अहमदनगरमधून पंतप्रधान मोदींचा प्रहार

PM Narendra Modi : भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे.

PM Narendra Modi :  आज लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा (BJP) आणि एनडीएला (NDA) भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची (INDIA Aghadi) एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे.

आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.  

चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगर जिल्हा दिशा देणारा आहे. विखे पाटील यांचं मोठं योगदान आहे आज याची मला आठवण येत आहे.  आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली. निवडणुकीआधी भानुमतीचा कुलाबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. भारतीयांना संतुष्ट करण्याची ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तूष्टीकरणांमध्ये लागली आहे.

 काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत

काँग्रेसला मुस्लिम लीग बनूनन टाकले आहे. एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत. इंडिया आघाडीचे सरकार आले तर गोर गरिबांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम लोकांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. 

मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी

मोदी सरकारने सुरक्षा विकासाची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात ढकलले आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे 1970 धरणाचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी धरण बनवण्यासाठी 8 कोटी किंमत होती त्याची किंमत आता 5 हजार कोटी झाली. हे पाप काँग्रेसने केले आहे. निळवंडे धरणातून शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी आहेत. मोदी सरकारच्या काळात ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळाले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

मोदी सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. अहिल्यानगर- सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले  आहे. रेल्वे, एअरपोर्टचा विकास करणे याकडे आमचे लक्ष आहे. शिर्डीच्या भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी, आम्ही प्रयत्नशील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget