(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित; कारण अद्याप अस्पष्ट, पाच जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार
Abhivadan Yatra: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण अद्याप अस्पष्ट असून पाच जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार आहे.
Laxman Hake And Abasaheb Waghmare: बीड : लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे (Abasaheb Waghmar) यांनी सुरू केलेली अभिवादन यात्रा (Abhivadan Yatra) आता स्थगित झाली आहे. ही यात्रा बीडमध्ये (BEED News) पोहोचल्यानंतर परळी (Parali) गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पहाटे लक्ष्मण हाके हे भगवानगडावर पोहोचले भगवानगडावर पोहोचल्यानंतर भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन या ठिकाणी घेतलं. त्यानंतर आज पासूनचा पुढचा जो दौरा होता तो रद्द करण्यात आलेला आहे. हा दोरा नेमका कोणत्या कारणामुळे रद्द झाला आहे हे समजू शकले नाही. दरम्यान, 5 तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला ते सुरूवात करणार आहेत.
ओबीसी आंदोलन प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांनी सुरू केलेली अभिवादन यात्रा स्थगित झाली आहे. ही यात्रा काल बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. बीडमध्ये पोहोचल्यानंतर परळी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पहाटे लक्ष्मण हाके आणि ओबीसी बांधव हे भगवानगडावर पोहोचले भगवानगडावर पोहोचल्यानंतर भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन या ठिकाणी घेतलं आता त्यानंतर आज पासूनचा पुढचा जो दौरा होता तो रद्द करण्यात आलेला आहे.. हा दोरा नेमका कोणत्या कारणामुळे रद्द झाला आहे हे समजू शकले नाही मात्र आज भगवान गडावरील दर्शनानंतर चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवी यांचं दर्शन प्राध्यापक लक्ष्मण हाके घेणार होते मात्र हा दौरा आता स्थगित करण्यात आला आहे आणि पाच तारखेनंतर पुन्हा उर्वरित पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा आजचा दौरा स्थगित : प्राध्यापक पी.टी चव्हाण
ओबीसी आंदोलन प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अभिवादन यात्रा करत आहेत. यादरम्यान बीडमध्ये या अभिवादन यात्रेआधीच तणाव निर्माण झाला आणि अखेर आजचा जो नियोजित लक्ष्मण हाके यांची अभिवादन यात्रेचा दिनक्रम होता. तो स्थगित करण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे हा दौरा स्थगित केला आहे. लक्ष्मण हाके यांचे सहकारी प्राध्यापक पिटी चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, 29 तारखेला ओबीसी आंदोलन हे सरकार सोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला भेटणार आहेत. त्यानंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील जो काही उर्वरित दौरा असेल त्याला सुरुवात होईल, अशी माहिती पिटी चव्हाण यांनी दिली आहे.