एक्स्प्लोर

Nilesh Lanke : अहमदनगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; सुजय विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप

Nilesh Lanke : अहमदनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे आता दोन निलेश लंके अहमदनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. 

Ahmednagar Lok Sabha Constituency : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपने (BJP) पुन्हा एकदा सुजय विखे पाटील (Sujay Vikhe patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निलेश लंके (Nilesh Lanke) निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अहमदनगर लोकसभेची निवडणूक दोन निलेश लंके लढवणार आहेत. 

अहमदनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके (Nilesh Sahebrao Lanke) यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. बारामतीत शरद पवार (Sharad Pawar), रायगड लोकसभेतून अनंत गीते (Anant Geete) यांच्यानंतर आता निलेश लंके या नावाचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे निलेश लंकेंना मतदान करणाऱ्या मतदारांची चांगलीच धांदल उडणार असल्याचे चित्र आहे. 

डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा - राजेंद्र फाळके

यावरुन महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पत्रकार परिषद घेत भाजपचे उमेदवार सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके (Nilesh Dnyandev Lanke) यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआकडून करण्यात आला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी केली आहे. 

शरद पवार - अनंत गीतेंच्या नावाचेही डमी उमेदवार

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) शरद पवार नावाच्या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok Sabha Constituency) माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते उभे आहेत. अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आता खऱ्या उमेदवारांना फटका बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नगरमधून अखेरच्या दिवशी 32 नामनिर्देशनपत्र दाखल 

दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. नगरमधून शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 43 वर पोहचली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

'इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हालाच लखलाभ असो', सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका

ना कुठला बडेजाव, ना कुठला भपका; निलेश लंकेंच्या साधेपणाने मनं जिंकली, दिव्यांग बांधवाच्या हस्ते भरला उमेदवारी अर्ज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget