एक्स्प्लोर

Rohit Pawar : चॉकलेट न मिळालेल्या लहान मुलासारखं विरोधक वागतायेत, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rohit Pawar : एखाद्या लहान मुलाला चॉकलेट नाही मिळालं की ते कसं करतं, तसं आमचं विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावलाय.

Rohit Pawar On Ram Shinde : भाजपचे (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे. हे दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राम शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतलाय. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट नाही मिळालं की ते कसं करतं, तसं आमचं विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावलाय.

मुदतीच्या आधी बारामती अॅग्रो हा साखर कारखाना रोहित पवारांनी सुरु केला म्हणून राम शिंदे यांनी प्रथम साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर साखर आयुक्तालयानं याप्रकरणी रोहित पवारांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर राम शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांची भेट घेत बारामती अॅग्रोवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावरुन रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जी कारवाई व्हायची ती होऊद्यात. मात्र, आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी मदत तरी मागायची असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लहान मुलांना चॉकलेट  नाही मिळाल्यावर ते कसं करत तसं काम आमचे विरोधक करत असल्याचा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावला.

आमच्या विरोधकांना फक्त राजकारण कळतं, शेतकऱ्यांचं हित कळत नाही

सामान्य लोकांना जर आम्ही मदत करत असू, कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांना जर मदत करत असू तर जी कारवाई व्हायची असेल ती होऊ द्या असे रोहित पवार म्हणाले. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटला होते, तेव्हा तुम्ही त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा, सरसरकट पंचनामे व्हावेत असे एकादा पत्र द्यायचे होते, असे रोहित पावर म्हणाले. आमच्या विरोधकांना फक्त राजकारण कळतं. विरोधकांना आम्ही उत्तर देऊ त्याची काळजी तुम्ही करु नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे.  त्यांना शेतकऱ्यांचं हित माहीत नाही, ते त्यांना झेपणार पण नाही असेही रोहित पवार म्हणाले.  म्हणूनच 2019 ला तुम्ही मतांच्या माध्यमातून आशिर्वाद दिल्याचे पवार म्हणाले. विकासकामं करत असताना अडचमी येत असतात असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या: 

Rohit Pawar : लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी : रोहित पवार

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget