(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी : रोहित पवार
लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
Rohit Pawar : शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर जर उच्चस्तरीय समिती लावली जात असेल तर मी कोरोना, लम्पी, दुष्काळ, अतिवृष्टी या काळात काम केलेले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी उच्चस्तरीय चौकशी लावावी. लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं. स्वतःचं सरकार आलं आहे म्हणून विरोधकांवर कारवाई करावी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटत असाल तर जाताना शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रश्न मांडा, पण त्यांना ते जमणार नाही कारण त्यांची ती प्रवृत्ती नाही, असा टोलाही रोहित पवारांनी आमदार राम शिंदेंना (Ram Shinde) लागवला.
भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राम शिंदेंनी यांनी बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या (Baramati Agro Ltd) उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. या प्रकरणी साखर आयुक्तांनी क्लिन चिट दिली होती. मात्र, राम शिंदेंनी साखर आयुक्तांच्याही चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मान्य केली आहे. यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा
शेतकऱ्यांच्या बाजूनं जेव्हा आपण निर्णय घेतो, तेव्हा त्या निर्णयाची अधिकारी देखील शहनिशा करतात. शेतकऱ्यांची बाजू घेतली असेल आणि उच्चतरीय चौकशी लावली जात असेल बिनधास्त चौकशी करावी असे रोहित पावर म्हणाले. विरोधकावर कारवाई करायची म्हणून एखादी व्यक्ती सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचे रोहित पावर यावेळी म्हणाले. पण त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्यांचे प्रश्न मांडावे. फक्त रोहित पावर यांच्यावर कारावाई करायची म्हणून भेटता, तर त्यावेळी बाकीचेही प्रश्न मांडा असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
आज तोडातोडीचं राजकारण सुरु
आज तोडातोडीच राजकारण सुरु आहे ते लोकांना आवडत नाही. एक मोठा पक्ष शिवसेना फुटताना आपण पाहिला आहे. आता एक मोठा पक्ष फुटल्यानंतर दुसरा मोठा पक्ष कोणता तर तो आहे राष्ट्रवादी आहे. त्यामुळं विरोधात असणारे ताकदवान पक्ष राष्ट्रवादीकडे पाहतील अस माझं होतं असे रोहित पावर यावेळी म्हणाले. भास्कर जाधव हे सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यामुळं जर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर करवाई केली असेल तर ते योग्य नाही. कोणी आमदार बंदूक घेतो हवेत गोळ्या घालतो, एखादा आमदार बोलतो म्हणून त्याच्या घरावर हल्ला होतो हे बघावं लागत, याची खंत आहे. लोकच आता याला उत्तर देतील असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोची चौकशीची करा; भाजप नेते राम शिंदेंचं साखर आयुक्तांना पत्र