Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्ते म्हणाले...
Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेवासा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
![Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्ते म्हणाले... Manoj Jarange Patil supporters from newasa taluka joined Shiv Sena in presence of Chief Minister Eknath Shinde Maharashtra Politics Marathi News Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्ते म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/79986bb4c6180a2d5afd29825aade4a21711116147188923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनासह शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेले, तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेवासा (Newasa) तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यात ॲड. कारभारी वाखुरे, भाऊसाहेब वाघ यांचे नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील उबाठाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यांनी केला प्रवेश
यात प्रकाश निपुंगे, संतोष माळवे, संजय शिंदे, ॲड. बाळासाहेब कावळे, ॲड. हर्षल गोरे, संदीप जाधव, वासुदेव जाधव, प्रकाश गरुटे, अमोल मोरे, सुनील शिरसाट, सुनील काळे, गणेश चौगुले, नितीन मीरपगार,अजय डौले, विठ्ठल नेहे, निलेश डौले, सुरेश वाकचौरे, राजेंद्र तांबे, किशोर गादे, रोहिदास सुरशे, चांगदेव माने आदींचा यात समावेश होता.
...म्हणून शिवसेनेत केला प्रवेश
मुख्यमंत्री शिंदे यांनी कुणबी दाखले व मराठा आरक्षण व समाजाच्या इतर प्रश्नांबाबत जी संवेदनशीलता आणि सकारात्मकता दाखवली तसेच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वोत्तम प्रयत्न केले. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देऊन त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे,शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील, मीरा गुंजाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा आरोप
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गृहमंत्र्यांनी माझ्याबद्दल एवढा द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. गृहमंत्र्यांनी स्वप्न बघायचं जरा कमी करावं. माझ्या क्लिप व्हायरल करून, मला तडीपार करण्याचं स्वप्न त्यांनी बघू नये. आता मराठा समाज तर विरोधात गेला आहेच, पण इतर समाजही विरोधात चालला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार, शरद पवारांची 9 जणांची संभाव्य यादी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)