एक्स्प्लोर

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी म्हणतात, मला निवृत्ती मिळायला हवी, पंतप्रधान मोदींनी 'या' व्यक्तींना द्यावी संधी

Governor Bhagat Singh Koshyari : मला निवृत्त व्हायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदी सेवाभावी कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Governor Bhagat Singh Koshyari : मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari Statement) यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मला निवृत्त व्हायचे आहे. मात्र, मी राज्यपालपदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

अहमदनगरमधील 'स्नेहालय' संस्थेच्यावतीने युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले की,  समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावं लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी या राज्यपालपदावर काम करतोय. खरं तर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला. त्यांनी  समाजासाठी खूप मोठ काम केलं असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

शेजारच्या देशात प्रगती व्हावी 

राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी शेजारील देशातही प्रगती व्हावी, असे प्रतिपादन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाने प्रगती केली आहे. विशेष करून मागील सात-आठ वर्षात देशाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली. ज्या घरात शौचालय नाही  तिथं शौचालय बनवण्यात आले. देशातील 33 कोटी लोकांचे बँकेत खातं सुरू करण्यात आले. अशी अनेक काम होतं असल्याने समाधान वाटतंय असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. मात्र,  आपल्या शेजारील देश देखील समृद्ध असावेत असेही त्यांनी म्हटले. शेजारचे देश कमकुवत असतील तर त्याचा आपल्या देशावरही परिणाम होतो.  त्यामुळे सर्वांचीच प्रगती होणं गरजेचं असल्याचे त्यांनी म्हटले. 

मुंबईबाबतच्या वक्तव्याने राज्यपालांविरोधात टीकेची झोड

मुंबईबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली होती. राजस्थानी आणि मारवाडी लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणाच नाही असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सर्वच पक्षांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले की, एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Palkhi Drone Video | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा ड्रोन व्हिडिओ पाहा ABP MajhaChandrakant patil on call | चंद्रकांत पाटलांनी फोनवर कुणाला खडसावलं? ABP MajhaABP Majha Headlines 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स 09 PM 06 July 2024 Marathi NewsPalkhi Ringan 2024 | संत सोपानकाका पालखीचे सोमेश्वर येथे यंदाचे पहिले रिंगण पार पडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
Embed widget