Ahmednagar News : अहमदनगरमध्ये बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
Ahmednagar News : घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना मार्फत या बोगस डॉक्टरवर कारवाई केली.
![Ahmednagar News : अहमदनगरमध्ये बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात Ahmednagar News Woman dies after delivery at bogus doctor hospital in Ahmednagar doctor in police custody Ahmednagar News : अहमदनगरमध्ये बोगस डॉक्टराच्या दवाखान्यात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/b1584260a90c6f1c0df98f7bed82d1ea167524789936289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmadnagar) रुईछत्तीशीत बोगस डॉक्टरमुळे एका बाळंतिणीला आपला जीव गमवावा लागलाय. पोलिसांनी सध्या या डॉक्टरला ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्ञानदेव पवार असं बोगस डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी या डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाऱ्या ज्ञानदेव पवार हा बोगस डॉक्टर रुईछत्तिशी येथे गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ दवाखाना चालवत होता. पत्र्याच्या शेडमध्ये अतिशय अस्वच्छ जागेवर आणि कोणत्याही प्रकारची सुविधा नसलेल्या ठिकाणी हा बोगस डॉक्टर दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाने दवाखाना चालवायचा. मंगळवारी या दवाखान्यात प्रसुतीसाठी आलेल्या पूजा गायकवाड या महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना मार्फत या बोगस डॉक्टरवर कारवाई केली.
धक्कादायक म्हणजे ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरवर याही पूर्वी एकदा कारवाई झाली होती, मात्र त्या कारवाईतून सुटून आल्यानंतर त्याने आपला गोरख धंदा पुन्हा सुरू केला आणि त्यातच एका महिलेल्या आपला जीव गमवावा लागला. एकीकडे गरोदर महिलांसाठी शासन-प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात, मात्र तरी देखील आजही ग्रामीण भागातील महिला सरकारी दवाखान्यात न जाता अशा बोगस डॉक्टरांच्या बळी ठरतात.
मृत पूजा गायकवाड हिने एका मुलीला जन्म दिला आहे, तिचं बाळ जरी सुखरूप असलं तरी तिला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. पण तिच्या नातेवाईकांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला, एवढंच काय तर त्यांनी पोलिसात देखील तक्रार दिली नाही. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दवाखाना सील करण्याचे आदेश दिलेत. अनेक रुग्णांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ होत असल्याचं सांगत बनावट परवाना प्रमाणपत्र तयार करणार्यांचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. हे बोगस डॉक्टर वैद्यकीय कोणतेही शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करुन उपचार करत असल्याचे दिसून आले आहे. बोगस डॉक्टर बनून तो लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत होता.
मोठी बातमी! राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन; 10 हजार डॉक्टरांचा संपात सहभाग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)