एक्स्प्लोर

Ahmednagar News : तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा, अहमदनगरचा पिंपरकणे पुल अखेर सर्वांसाठी खुला, 60 किमीचा प्रवास वाचणार!

Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 2006 साली मंजूर झालेला पिंपरकणे पुल अखेर सर्वसामान्यांच्या स्वागतासाठी खुला झाला आहे.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 2006 साली मंजूर झालेला पिंपरकणे पुल अखेर सर्वसामान्यांच्या स्वागतासाठी खुला झाला आहे. अवघ्या 560 मीटरचा पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 17 वर्ष लागली. अखेर आज या पुलाचं काम पूर्ण होऊन राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या पुलामुळे आदिवासी डोंगराळ भागातील 25 गावांचा फायदा होणार असून 60 किमीचा प्रवास वाचणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील (Akole) राजूर ते पिंपरकने येथील पुलाचा लोकार्पण आज सोहळा पार पडला आहे. 2006 साली मान्यता मिळलेला हा पूल व्हायला 2023 उजाडलं असून आदिवासी भागासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे (Raghoji Bhangare) यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण (Bridge) करण्यात आलं आहे. कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी आनंदोत्सव साजरा करत आदिवासी गीतावर ठेका धरला. तब्बल सतरा वर्षांनंतर सतरा गावातील रस्त्याची समस्या सुटल्याने आदिवासी बांधवांनी देखील आनंदोत्सव साजरा केला. 

गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाची प्रतीक्षा होती. तब्बल 17 वर्षांचा कालावधी पूल तयार होण्यास लागली. यानंतर आज पूल सर्व सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. आजूबाजूच्या आदिवासी भागात आरोग्य व्यवस्था कमतरता असल्याने या पुलामुळे आदिवासी ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना आता शाळेपासून वंचित राहावे लागनार नाही अस मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केलं. प्रवरा नदीवरील निळवंडे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 200 फूट उंची असणाऱ्या या पुलामुळे परिसरातील पर्यटनसुद्धा वाढणार असून या पुलावरून सनरेज आणि सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी ग्रेडी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होणार 

अकोले तालुक्यातील पिंपरकणे पुल हा अनेक वर्षापासुन रखडलेल्या अवस्थेत होता. 22 ते 35 गावांना आजमितीस रंधा मार्गी यावे लागते. ते अंतर आता फक्त पाच किलोमीटर होणार आहे. हा पुल अनेक गावांना राजुर बाजारपेठेजवळ आणणार असुन आदिवासी समाज्यातील अनेक गांवाची मुख्य बाजारपेठ ही राजुर असुन शेतीमाल विक्री व खरेदी यासाठी शेतकरी वर्गास मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. याच कारणाने हा पुल महत्वाचा आहे. मात्र आता या पुलामुळे सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget