एक्स्प्लोर

Ahmednagar Crime : चोर असल्याच्या संशयावरून परप्रांतीय युवकाला मारहाण; Video व्हायरल होताच झाला भांडाफोड

Ahmednagar Crime News : चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय युवकाला मारहाण झाल्याची घटना अहमदनगरच्या सारसनगर भागात उघडकीस आली आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर : नवनागापूर (Navnagapur) येथे अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरातील सारसनगर (Sarasnagar) भागामध्ये चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय युवकाला मारहाण (Beating) झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे अहमदनगर एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली.

चौघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

राजू हिरा घोष (Raju Hira Ghosh) असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये (Bhingar Police Station) पाच जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण औसरकर, बाबासाहेब पुंड, विशाल इवळे, ऋषिकेश जायभाय, ऋतिक पुंड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील चौघांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. सध्या घोष याच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

व्हिडीओ व्हायरल होताच झाला भांडाफोड

चोरीच्या संशयावरून राजू घोष याला झाडाला बांधून व लटकावून अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले. त्यानंतर घोष याला सोडून देण्यात आले. काही वेळातच व्हिडीओ चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आपण अडचणीत येणार असा संशय मारहाण करणार्‍यांना आल्याने त्यांनी घोष याचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे त्या मारहाण करणार्‍यांनी पोलिसांना सांगितले. परंतु त्याला झालेली गंभीर मारहाण व व्हिडीओ चित्रिकरण यावरून पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून चौघांना तात्काळ अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Latur Paper Leak Case: मोठी बातमी! नीट पेरफुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही, जिल्ह्याजिल्ह्यात पसरलंय सबएजंट्सचं जाळं; दोन आरोपी शिक्षकांची कबुली

निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्राबाहेर पैशाच्या पाकिटांसह एकास पकडलं; ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले

व्हिडीओ

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Embed widget