एक्स्प्लोर

Ajay Baraskar : अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा, वयस्कर व्यक्तीला मारहाण, पोलिसांकडून दोघे ताब्यात

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांच्या घरी घुसून दोन मद्यधुंद तरुणांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

अहिल्यानगर : अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) हे मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी यापूर्वी टीकेची झोड उठवली होती. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बारस्कर यांच्या घरातून संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. 

नेमकं काय घडलं?

अजय महाराज बारस्कर यांच्या घरी रात्रीच्या वेळी दोन तरुण दाखल झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतं. ते दोघे येतात त्यावेळी अजय बारस्कर यांची आई तिथं बसलेली असते. त्यानंतर तिथं बारस्कर यांच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती येतो. हे पाहताच दोन तरुणांपैकी एक जण त्या व्यक्तीला मारहाण करतो. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याची माहिती अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे. 

अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर आरोप

अजय महाराज बारस्कर यांनी यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. या आरोपानंतर जरांगे समर्थकांनी बारस्कर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. घरामध्ये येऊन धिंगाणा घालणारे दोन मद्यधुंद तरुण मनोज जरांगे समर्थक असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. घराच्या बाजूला दुकान आहे, तिथं ऑफिसमध्ये बसलेलो होतो. मला फोन आला आणि घरी पळत गेलो. ते माझ्या घरात घुसले तेव्हा आई घरात बसलेली होती. मी घरी पोहोचलो तेव्हा ते तरुण माझ्या आईला आणि वयस्कर व्यक्तीला मारत असल्याचा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला. या प्रकरणाचं सीसीटीव्ही पोलिसांकडे दिल्याचा दावा देखील त्यांनी केला. म्हाताऱ्या माणसांना आणि स्त्रीला मारण्याची संस्कृती आपली आहे का असा सवाल बारस्कर यांनी जरांगे यांना केला. 


पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून त्या दोघांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असताना अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे ही शांतता बैठक आहे का, असा सवाल केला. दारु पिऊन माझ्या आईला मारल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. घरात जाऊन मारहाण करण्याचा अधिकार कुणाला नाही, असं बारस्कर म्हणाले.  दरम्यान, अजय महाराज बारस्कर, त्यांच्या आई आणि शेजारील व्यक्तीला मारहाण केल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Allu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEOUddhav Thackeray PC :बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का?ठाकरेंचा मोदींवर घणाघातAllu Arjun Arrested :  पुष्पा 2 प्रिमियरला चेंगराचेंगरी,  चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला अटकAllu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Eknath Shinde list of possible ministers : प्रकाश आबिटकर की राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
प्रकाश आबिटकर की राजेश क्षीरसागर की राजेंद्र पाटील यड्रावकर? शिंदेसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर!
Embed widget