या चित्रपटाने सलमानचा नुकताच प्रदर्शित झालेल्या सुल्तान या चित्रपटाला धोबीपछाड दिला आहे. कबालीने पहिल्याच दिवशी 55 कोटीचा गल्ला कमावला, तर सुल्तानने पहिल्या दिवशी 36.5 कोटीची कमाई केली होती.
2/9
फक्त केरळ राज्यात या चित्रपटासाठी 306 स्क्रिन तर मुंबईत 275 स्क्रिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
3/9
दक्षिण भारतातील अनेक शहरांमध्ये कबालीच्या पुढील 4 ते 5 दिवसांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे.
4/9
बॉलीवूडचे तिन्ही खान चित्रपट प्रदर्शनासाठी सुट्टीच्या दिवसाचीच निवड करतात, मात्र रजनीकांतच्या चित्रपटा दिवशीच सुट्टी दिली जाते, असे सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये म्हणले आहे.
5/9
या चित्रपटावरून सलमान, शाहरूख आणि आमीर खानच्या चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसाची सोशल मीडियावरूनही खिल्ली उडवली जात आहे.
6/9
दिग्दर्शक पा. रंजीत आणि सुपरस्टार रजनीकांतचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत एका गँगस्टरची भूमिका साकरत आहे.
7/9
पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार, कबालीनेही चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी 55 कोटीची कमाई केली.
8/9
मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांतच्या कबालीया चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 55 कोटींची कमाई केली आहे.
9/9
मुंबई: सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित 'कबाली' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.