एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | अजय देवगणची मुलगी न्यासाला कोरोनाव्हायरसची लागण?
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अजय देवगण तिला बचाव करण्यासाठी पुढे येत असतो.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या या काळात बॉलीवूड सेलिब्रिंटींनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वत:ला क्वॉरन्टाईन करुऩ घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणची पत्नी काजोल मुलगी न्यासाला कोरोना झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजय देवगणने या सर्व चर्चांचं खंडण केलं आहे. माझी पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा यांची प्रकृती उत्तम असल्याचा खुलासा अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता.
‘विचारल्याबद्दल धन्यवाद. काजोल आणि न्यासा एकदम ठीक आहे. त्याच्या तब्येतीच्या सर्व अफवा खोट्या आहेत’ अशा प्रकारचं ट्वीट अजयने केलं आहे.
दरम्यान न्यूजट्रॅकच्या माहितीनुसार, ‘कोरोनाची लक्षण दिसल्यामुळे अजय देवगण आणि काजोल मुलगी न्यासाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यानंतर न्यासाच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. ज्यात मुलगी न्यासाला कोरोना झाल्याचं समोर आलं’. हा दावा फेटाळत अजय देवगणने पत्नी काजोल आणि न्यासा कोरोनापासून सुरक्षित असल्याचं मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.Thank you for asking. Kajol & Nysa are absolutely fine. The rumour around their health is unfounded, untrue & baseless????
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 30, 2020
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अजय देवगण तिला बचाव करण्यासाठी पुढे येत असतो. 18 मार्चला काजोल व तिची मुलगी न्यासा एअरपोर्टवर दिसल्याची देखील चर्चा होती. अजय देवगण आपल्याला त्याच्या आगामी ‘सुर्यवंशी’ या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. या आधी अजय देवगणच्या तानाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. Coronavirus | Kanika Kapoor | कनिका कपूरमुळे कोरोना संसदेत पोहोचला? म
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement