Tarla Review : मनोरंजनाची मेजवानी देणारा 'तरला'; हुमा कुरैशीच्या अभिनयानं वाढली सिनेमाची गोडी
Tarla : हुमा कुरैशीचा (Huma Qureshi) 'तरला' हा सिनेमा नुकताच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
पीयूष गुप्ता
हुमा कुरैशी, शरीब हाश्मी,
Tarla Movie Review : उत्तम कथा आहेत की नाही? मूळ कथानक असलेल्या गोष्टींची निर्मिती होत आहे का? अभिनयाचं एकच सूत्र आहे का? संपूर्ण कुटुंबियांना ओटीटीवर एकत्र सिनेमा पाहता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नुकताच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेला 'तरला' (Tarla) हा सिनेमा पाहिल्यावर मिळतील. 'तरला' या सिनेमाचं कथानक पद्मश्री पुरस्कार विजेते शेफ तरला दलाल यांनी लिहिलेलं आहे. या सिनेमाचं कथानक हृदयाला स्पर्श करणारं आहे.
'तरला' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Tarla Movie Story)
'तरला' या सिनेमाचं कथानक सत्यघटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. तरला दलालला आयुष्यात काय करायचं आहे हेच माहीत नाही. तरला दलाल (Tarla Dalal) एक सामान्य मुलगी असून मध्यमवर्गीय कुटुंबात तिचं लग्न होतं. पण चांगला पती मिळाल्यामुळे तो तिला स्वप्न पाहायला आणि ते साकार करायला मदत करतो. पतीची साथ मिळाल्यामुळे तरला एक उत्कृष्ट शेफ कशी बनते याचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. सामान्य मुलगी ते मास्टर शेफपर्यंतचा संघर्षमय प्रवास प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवतो. या सिनेमाचं कथानक अप्रतिम आहे.
हुमा कुरैशीने सटल अभिनयाने जिंकलं प्रेक्षकांचं मन
अभिनयाचं एकच सूत्र आहे का? याचं पद्धतशीर उत्तर हुमा कुरैशीने (Huma Qureshi) 'तरला' या सिनेमात दिलं आहे. 'महाराणी', 'मोनिका ओह माय डार्लिंग' किंवा 'डबल एक्सएल' गेल्या काही दिवसांपासून हुमा चाहत्यांना थक्क करत आहे. या सिनेमासाठी हुमाने खूप मेहनत घेतली आहे. तारुण्यापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा हुमाचा प्रवास पाहताना प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो. मास्टर शेफने सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये कमाल काम केलं आहे. तिच्या सटल अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. त्यामुळे आता आणखी चांगलं काम करण्याचं हुमापुढे एक आव्हान असेल.
हुमाचे वडील समील कुरैशी हे सलीम नामक एका रेस्टॉरंटचे मालक आहेत. त्यामुळे आपण करत असलेलं काम मुलीला करताना पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शरीब हाश्मीच्या (Sharib Hashmi) अभिनयाचंही कौतुक. तो एक दमदार अभिनेता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या सिनेमानंतर शरीबच्या चाहतावर्गात आणखी वाढ झाली आहे.
'तरला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पीयूष गुप्ता (Piyush Gupta) यांनी सांभाळली आहे. 'छिछोर' आणि 'दंगल' सारख्या सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन पीयूषने केलं आहे. चांगल्या कथानकाची उत्तम निर्मिती होऊ शकते हे पीयूषने दाखवून दिलं आहे. त्यामुळे पियूषचं खूप-खूप कौतुक.
'तरला' हा सिनेमा पाहताना पहिल्यांदा मला असं वाटलं की, हा सिनेमा आणखी थोडा लांबला असता तर अजून मजा आली असती. 'तरला'ची कथा आणखी खोलात पाहताना आणखी मजा आली असती. हा सिनेमा फक्त दोन तासांचा आहे. मुद्दाम हा सिनेमा छोटा बनवला असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमातील गाणीदेखील चांगली आहेत. एकंदरीतच 'तरला' हा कौटुंबिक सिनेमा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.