एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Haddi Movie Review : नवाजुद्दीनच्या अभिनयाने नटलेला, परंतु सादरीकरणात फसलेला 'हड्डी'

Haddi Review : 'हड्डी' या चित्रपटात तृतियपंथियांचं जग, तृतियपंथियांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न झालाय, पण तो फार वरवरचा आहे.

Nawazuddin Siddiqui Haddi Movie Review : देशातील तृतीयपंथियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) माझा कट्ट्यावर आल्या असताना त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगितल्या. लिंगबदल ऑपरेशनबाबतही सांगितले. खरे तर त्यांच्या या गोष्टी अगोदरपासूनच ठाऊक होत्या, मात्र सुष्मिता सेन (Sushmita Sen) अभिनीत 'ताली' (Taali) वेबसीरीजमुळे गौरी सावंत यांची कथा पुन्हा एकदा समोर आली होती. गौरी सावंत यांच्या या गप्पा आणि तालीची आठवण नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) अभिनीत नवा चित्रपट 'हड्डी' (Haddi) पाहताना आली.

'हड्डी' (Haddi Movie Review) हा एका तृतीयपंथीयाच्या बदल्याची कथा आहे. हरीला (नवाजुद्दीन सिद्दीकी) लहानपणापासूनच मुलगी व्हावेसे वाटत असते. तो हरीचा हरिका होतो. मात्र तो ज्या गुरुकडे राहात असतो ती जागा प्रमोद अहलावत (अनुराद कश्यप)ला हवी असते. त्यानंतर अशा काही घटना घडतात की हरिकाला पुन्हा हरी बनावे लागते. हरी मानवी हाडांच्या तस्करीत गुंततो त्यामुळे त्याला हड्डी म्हणून ओळखले जाऊ लागते. हाडांच्या तस्करीतून आणखी पैसे कमवण्यासाठी तो दिल्ली येतो. येथे येऊन तो प्रमोद अहलावतसोबत काम करू लागतो आणि शेवटी ज्या कामासाठी तो आलेला असतो ते पूर्ण करतो.

'हड्डी' या चित्रपटात तृतियपंथियांचं जग, तृतियपंथियांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न झालाय, पण तो फार वरवरचा आहे. एका बदल्याच्या कथेसाठी फक्त तृतीयपंथीयाची पार्श्वभूमी घेण्यात आलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला फ्लॅशबॅक पद्धतीने हरी आणि हरिकाची कथा सांगण्यात आलेली आहे.

अभिनयाच्या बाबतीत नवाजुद्दीनने त्याच्या वाट्याला आलेली हरी, हरिकाची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या टिकू वेड्स शेरूमध्ये नवाजुद्दीनने क्लायमॅक्समध्ये महिलेची भूमिका साकारत अॅक्शन केली होती. या चित्रपटातही त्याने तसेच केले आहे. नवाजुद्दीनचा अभिनय चांगला असला तरी त्याला पटकथेची चांगली जोड न मिळाल्याने चित्रपट प्रभाव पाडत नाही.

अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) या चित्रपटात पुन्हा एकदा अभिनयाची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा अभिनय बघवत नाही. चित्रपट दिग्दर्शित करायचे सोडून तो अभिनयाच्या भानगडीत का पडतो तेच समजत नाही.

मोहम्मद झिशान अयूबने हड्डीवर प्रेम करणाऱ्या इरफानची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. नवाजुद्दीन आणि झिशानमधील केमिस्ट्री चांगल्या प्रकारे दाखवलीय. इला अरुण यांनी तृतियपंथियांच्या गुरुची रेवतीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. 

राधेशाम, एके वर्सेस एके आणि 'मेजर' चित्रपटाचे लेखक अक्षत अजय शर्माने हड्डीमधून प्रथमच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हड्डीची पटकथा अक्षतने अदम्य भल्लासोबत लिहिलेली आहे. मात्र पटकथेतून तो प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्यात अयशस्वी ठरलाय, ती कसर तो दिग्दर्शनातून भरून काढू शकला असता परंतु तेथेही तो कमी पडला आहे. एकूणच 'हड्डी' म्हणावा तेवढा प्रभाव टाकत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Embed widget