(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाचं जग दाखवतो "खो गए हम कहां"; अनन्या पांडेचा अभिनय जिंकेल मन! वाचा रिव्ह्यू
खो गए हम कहां (Kho Gaye Hum Kahan) हा चित्रपट हे वास्तव दाखवतो.
अर्जुन वरैन सिंह
अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव
Kho Gaye Hum Kahan Review: आजकाल सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. याचा अर्थ बहुतेक लोक दिवसातून 200 वेळा त्यांचे फोन चेक करत असतात. अनेक लोक सोशल मीडियावर इतरांना स्टॉक देखील करतात. सोशल मीडियावर इतर लोक काय करत आहेत? हे अनेक लोक पाहतात. एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही, दुसरे अकाऊंट तयार करा आणि ती व्यक्ती काय करत आहे ते पहा, असं अनेक लोक करतात. निदान आजची पिढी तरी हे बरंच काही करते आणि हे वास्तव खो गए हम कहां (Kho Gaye Hum Kahan) हा चित्रपट दाखवतो.
चित्रपटाचे कथानक
अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव या तीन मित्र-मैत्रिणींची ही कहाणी आहे. अनन्या आणि सिद्धांत हे एकाच फ्लॅटमध्ये राहतात. ते भाऊ-बहीण नाहीच, ते रिलेशनशिपमध्ये देखील नाही,ते लिव्ह-इनमध्ये देखील राहात नाहीत, ते फक्त मित्र-मैत्रिणी आहेत. एक मुलगा आणि मुलगी मित्र असू शकतात.
चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, सिद्धांतने वयाच्या 9 व्या वर्षी त्याची आई गमावली. आता तो स्टँडअप कॉमेडीद्वारे त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. अनन्या जॉब करत असते परंतु अनन्याचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो काय करतो? हे पाहण्यात अनन्याचा पूर्णवेळ झातो. आदर्श हा जिम ट्रेनर आहे आणि त्याला स्वतःची जिम चेन उघडायची आहे.सिद्धांत, अनन्या आणि आदर्श हे तिन्ही मित्र मिळून जीम सुरू करायचं ठरवतात. पण मग नंतर काय? सोशल मीडियाच्या या जगामुळे त्यांचं आयुष्य कसं बदलतं? हे पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहावा. तुम्ही तुमच्या फोनवर आणि सोशल मीडियावर काय करत आहात? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. काय बरोबर आणि काय चूक? हे देखील तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.
कलाकारांचा अभिनय
अनन्या पांडेने या चित्रपटात चांगला अभिनय केला आहे. ही ओळ वाचल्यानंतर ट्रोल करणारे म्हणतील की, तुला पैसे मिळालेत पण आता तिने चांगला अभिनय केला आहे, तर चांगलंच म्हणणार ना. अनन्याचे पात्र आजच्या तरुणींसारखेच आहे आणि तिने हे पात्र पूर्ण प्रामाणिकपणे साकारले आहे.
सिद्धांत चतुर्वेदी हा एक चांगला अभिनेता आहे आणि या चित्रपटात देखील त्यानं हे सिद्ध केलं आहे. त्यानं स्टँडअप कॉमेडियनचे पात्र चांगल्या पद्धतीनं साकारलं आहे. तो स्टँडअप कॉमेडी देखील अशा प्रकारे करतो की, हा त्याचा दुसरा करिअर ऑप्शन ठरु शकतो.
आदर्श गौरवने अप्रतिम काम केले आहे. तो चित्रपटात जिम ट्रेनरच्या भूमिकेत आहे. तो सुपर फिट देखील दिसतो. मलायका जेव्हा त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील एका सामान्य जिम ट्रेनरसारखेच असतात. ज्याचे त्या फोटोनंतर फॉलोअर्स वाढतात. चित्रपटात कल्की कोचलिनने देखील चांगले काम केले आहे. रोहन गुरबक्षनीचे कामही चांगले आहे.
कसा आहे चित्रपट?
ना जवान, ना पठाण, ना अॅनिमल, ना डंकी, या चित्रपटात जे देखवण्यात आलं आहे, ते आपण रोज जगत आहोत. हा चित्रपट पाहून तुम्हाला आठवेल की, तुम्हीही हे करत आहात. तुमचे मित्रही हे करतात. हा चित्रपट वास्तवाच्या अगदी जवळ आहे. चित्रपटात कुठेही हिरोपंती नाही. सर्व काही खरे आहे.
हा चित्रपट बघताना आपण विचार करतो की, आपल्या आजूबाजूलाही हे सर्व घडत आहे. सोशल मीडियाच्या युगात आपण खूप काही गमावत आहोत. आपल्याला इतरांसारखं आयुष्य जगायचं आहे. आपण हॉलिडे सेलिब्रेट करत नाही पण हॉलिडेचे फोटो पोस्ट करतो. आपले वाढदिवस देखील सोशल मीडिया इव्हेंट बनत आहेत. हा चित्रपट आपल्याला रिअॅलिटी चेक देतो.
चित्रपटाचे दिग्दर्शन
अर्जुन वरण सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गली बॉयमध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. ते तरुणांना चांगलाच समजून घेतो, असे चित्रपट पाहून वाटते. या चित्रपटात कुठलाही गदारोळ नाहीये. तसेच कोणतेही हिरोपंती संवाद नाहीत. तरीही चित्रपट तुम्हाला स्पर्शून जातो.एकंदरीत हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.