Hanu Man Movie Review: 'आदिपुरुष'ला लाजवणारं VFX, अंजनाद्री गावातील सुपरहिरोची कथा, कसा आहे 'हनुमान'?
Hanu Man Movie Review : ओम राऊत याने 30 करोड मध्ये जवळपास अडीच वर्षात तयार झालेला Hanu Man सिनेमा बघून खरं आता विपश्यना केंद्राला जायलाचं हवं.
प्रशांत वर्मा
तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार
theatre
Hanu Man Movie Review : 600 ते 700 करोड रुपयांचा चुराडा करणाऱ्या दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने 30 करोड मध्ये जवळपास अडीच वर्षात तयार झालेला Hanu Man सिनेमा बघून खरं आता विपश्यना केंद्राला जायलाचं हवं आणि आपलं VFX कुठं माती खात होतं याचा बेसिक सुगावा तरी यातून त्याला लागू शकतो!
Hanu Man सिनेमाचा प्लॉट अंजनाद्री या गावचा नायक हनुमंत म्हणजेच तेज सज्जा, त्याची बहीण, त्याची क्रश आणि व्हिलन मायकल यांच्या अवतीभवती असलेला पाहायला मिळतो. बजरंगबलीची ताकद कशी हनुमंतला मिळते, अंजनाद्री गावासोबत जोडली गेलेली पौराणिक कहाणी आपल्याला या सिनेमात पाहायला मिळते. चित्रपटातील थोडेफार सीन्स पाहताना आजवर पाहिलेल्या कित्येक सिनेमामधून काही ना काही उचललेलं असल्यासारखं देखील वाटतं.
तुम्हाला आदिपुरुष सिनेमा चावला असेल तर त्यावरची Hanu Man ही लस आहे म्हणावी लागेल, हनुमान पाहताना तुम्ही आदिपुरुषला नक्कीच आठवाल आणि तुम्ही दोन शिव्या देखील हसाडाल.
हनुमान सिनेमा एकदम परफेक्ट चित्रपट नाहीये, काही उतार चढाव आहेतच, बरेच सिन बोरिंग,रटाळ आणि उगाचच कॉमेडी घुसवलेले वाटले जिथं हसू येत नाही. मात्र जे काही VFX आहेत ते कमाल आहे. लो बजेटमध्ये तगडं VFX आहे. अंजनाद्री गाव ज्याप्रमाणे उभं केलंय, ते अप्रतिम आहे. गावाचं लोकेशन सिनेमॅटिक सीन्स, गावची लोकं, त्याचं Costume शिवाय प्रत्येक पात्र सुंदर आहेत. हनुमान सिनेमात सगळ्यात महत्वाचा आहे तो क्लायमॅक्स, त्याचीच चर्चा जबरदस्त होतेय. खरंतर तेलुगू इंडस्ट्रीमध्ये खूप वेळा सांस्कृतिक, पौराणिक विषय अतिशय मस्त हाताळले आहेतच. त्यात या सिनेमाची भरच म्हणावी लागेल.
सिनेमाचा नायक हा तेजा सज्जा याने बालपणीच हा चिरंजीवीच्या Choodalani Vundi (1998) या सिनेमात काम केलं होतं. चिरंजीवीचा उल्लेख यासाठी मी करतोय कारण, हनुमान सिनेमाच्या प्लॉट सारखाच Anji (2004) चा 'आत्मलिंग' ची शक्ती असलेला सिनेमा सुद्धा क्रिश सोबत आठवतो.
काय नाही आवडलं?
ट्रेलर मध्ये जे दिसलं तेच अगदी सिनेमात आहे, सापडलेल्या शक्तिशाली मनी मुळं नायक सुपरहिरो होतो, दिव्य शक्ती मिळते ते खटकलं. वास्तविक आपल्याला पौराणिक कथेत नेहमी कठोर परिश्रम, अभ्यास करूनच शक्ती-सिद्धी प्राप्त केलेल्या ऐकलं आहे. मात्र नायकाला विना तपस्या मिळालं. कित्येक जपानी चाईना अनिमेमध्ये, डॉक्टर स्ट्रेंज ते बॅटमॅन मध्ये हेच दाखवलं आहे की परिश्रम करूनच शक्ती मिळते. त्यातही नायकलाच सहज मनी का मिळतो? बरं तो मनी फक्त सूर्यप्रकाशात काम करतो शक्ती देतो.शिवाय नायक मात्र अगदी बच्चू वाटतो. नायक एकीकडे गावात चोऱ्या करत असतो जे मजेदार दाखवण्याच्या नादात नायकाचा सीरियसनेस गेलाय.सिनेमाचा व्हिलन जसा बोगस आहे तसाच हिरो देखील. मात्र गावाचा प्रमुख जो असतो तो मात्र तगडा वाटला.
सिनेमा इंग्लिश हिंदी सह कोरियन, स्पॅनिश, जापनीज, चायनीज भाषेत सुद्धा रिलीज केलाय, याचं कारण दिग्दर्शकाने प्रतिसाद मिळतोय असं दिलंय ते पटलेलेलं नाहीये.
Hanuman सिनेमा पाहावा का?
हो, नक्की बघा. कलाकारांचा अभिनय, उत्तम BGM, उत्तम स्क्रिनप्ले, तगडं VFX, हा सिनेमा तुम्ही फॅमिली सोबत नक्की बघू शकता, खूप भारी आहे असंही नाहीयेपण पैसा वसूल नक्कीच आहे. तुम्हाला क्रिश आठवेल, ACTION पाहायला मिळेल, थोड प्रेमप्रकरण थोडे देव देवता आणि आगामी सिक्वेन्समध्ये येणारी रहस्य पाहण्यासारखी असतील!
मी या सिनेमाला देतोय 3 स्टार.
विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!
कसा आहे 'मस्त में रहने का'? वाचा रिव्ह्यू
Three Of Us Movie Review: कसा आहे थ्री ऑफ अस?