एक्स्प्लोर

Three Of Us Movie Review: शैलजाच्या आठवणींचा पिटारा; कसा आहे थ्री ऑफ अस? वाचा रिव्ह्यू

Three Of Us Movie Review: थ्री ऑफ अस (Three Of Us)  हा चित्रपट शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत या तिघांच्या अभिनयानं नटलेला चित्रपट आहे.

Three Of Us Movie Review:  एक तमाशा शोर का कल फिर से खेला जाएगा, 
                                                एक पत्थर आस का सासो से ठेला जाएगा,  
                                                कल तो तब ही आयेगा जब आज खेला जयेगा... 

शैलजा जेव्हा बऱ्याच वर्षांनी भेटते तेव्हा प्रदीपची हरवलेली कविता त्याला पुन्हा गवसते. मुंबईत राहणारी शैलजा बऱ्याच वर्षांनी तिच्या गावी वेंगुर्ल्यात जाण्याचा हट्ट तिचा पती दीपांकर देसाई याच्याकडे करते आणि मग बायकोची काळजी करणारा दीपांकर आणि शैलजा यांची जोडी आठवड्याभरासाठी कोकणात अवतरते. मग उलघतो शैलजाच्या आठवणींचा कोकणी कॅन्व्हास. वेंगुर्ल्यात भेटलेला प्रदीप कामत, त्याची पत्नी, मुलं सगळे 
शैलजाचा कॅन्व्हास रंगवतात. अशी काहीशी तुमच्या आमच्यातली ही सुंदर गोष्ट आहे.  

आयुष्य एक पुस्तक आहे आणि आपल्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने ही वेगवेगळ्या आठवणींनी भरलेली असतात, लहानपणीचं प्रेम, शाळा, मामाचं गाव, घर, गावची जत्रा, वेगवेगळ्या करामती प्रत्येकाच्या आयुष्याच्या पुस्तकात एक भावविश्व जपलेलं दडलेलं असतं, लहानपणी हृदय मोठं असतं म्हणूनच हा कॅन्व्हास मोठा वाटतो.  

थ्री ऑफ अस (Three Of Us)  गेल्यावर्षी अवघ्या 1 तास 40 मिनिटांचा सिनेमा (24 November 2022) दिवाळीत प्रदर्शित झाला, नुकताच तो नेटफ्लिक्स वरती आणि सोशल मीडियावर कौतुकांची तोरणं सिनेमा सजवतोय. शैलजा पाटणकर म्हणजे शेफाली शाह, तिचा पती दीपांकर देसाई अर्थात स्वानंद किरकिरे आणि प्रदीप कामत म्हणजे जयदीप अहलावत या तिघांच्या अभिनयाचा साज सिनेमाला लागला आहे. अप्रतिम डायलॉग्स, उत्तम स्क्रिनप्ले, पडद्यावर दिग्दर्शक अविनाश अरुण याने चित्रित केलेलं कोकण आणि शैलजाचं मुंबईतलं जीवन अगदी जिवंत वाटतं.  

Dementia म्हणजेच स्मृतिभ्रंश, स्मरणशक्ती जाण्याचा आजार हा शैलजाला झालेला असतो आणि तिचा पती मुलगा प्रेमाने काळजी घेताना दाखवतो.   शैलजा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या उंबऱ्यावरती उभी असलेली पाहायला मिळते, तिच्या पुस्तकातली पाने विसरण्याआधी पुन्हा  भूतकाळ बालपणातील आठवणी गडद करायचा ती अलगद प्रयत्न करते, वेंगुर्ल्यात  बालपणीच्या प्रेमासह कोकणच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरून 
प्रवास हा भारावून टाकणारा आहे.

हाडाचा सिनेमॅटोग्राफर असलेला अविनाश अरुण याने आठवणीत राहणारे सिनेमे दिलेत, दृश्यम, पातल लोक, मदारी, कारवान सोबतच त्याचा 'किल्ला' हा सिनेमा सुद्धा सुंदर आहे, अविनाशच्या दिग्दर्शनामध्ये त्याच्या आजवरच्या कामाची छाप थ्री ऑफ अस या चित्रपटामध्ये तंतोतंत उतरली असल्याचं दिसतं. सिनेमाच्या प्लॉटमध्ये उभे असलेले कलाकार, BGM, फ्रेमिंग अगदी बाप आहे. सिनेमा संथ असला तरी पुस्तकाचं पाने उलघडता उलघडता आगदी आलेल्या शेवटच्या पानाचा कॅन्व्हास देखील सुंदरतेने थांबवलाय. काहीही तडक भडक नसलेला हा साधा सरळ सिनेमा एक गोड हस्य तुमच्या आमच्या चेहऱ्यावर नक्की देऊन जाईल.भरभरून स्टार्स देता येईल असा गोड सिनेमा आहे, मात्र एवढी वर्ष शैलजाच्या पतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या दीपांकरला शैलजाचं बालपण काहीच कसं माहित नसतं हे मात्र थोडंसं खटकलं, बाकी सर्व उत्तम.  सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार!

विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!

Bhakshak Movie Review : वाचा रिव्ह्यू!
Hanu Man Movie Review : कसा आहे 'हनुमान'?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget