एक्स्प्लोर

Govinda Naam Mera Review : गोविंदा नाम मेरा...! हलका फुलका मसाला चित्रपट

Govinda Naam Mera Review  | गोविंदा नाम मेरा चित्रपट मसाला एंटरटेनर आहे. सिनेमात आपल्याला विकी, कियारा, भूमीची नवीन स्टाईल पाहायला मिळेल 

Govinda Naam Mera Review :आपण अनेक चित्रपट पाहत असतो मात्र काही चित्रपट हे फक्त टाईमपास आणि मनोरंजनासाठी असतात. असे चित्रपट सिनेमागृहात पाहताना डोकं घरी ठेवावं लागतं आणि जर तुम्ही घरी OTT वर चित्रपट बघत असाल तर आपलं डोकं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. असं केलं तरच अशा चित्रपटाचा आनंद तुम्हाला घेता येईल. गोविंदा नाम मेरा हा देखील असाच चित्रपट आहे. एक हलका फुलका फुल्ल मसाला  एंटरटेनर असलेला चित्रपट.

कथा- ही कथा आहे गोविंदाची म्हणजेच विकी कौशलची जो एक डान्सर आहे. त्याची पत्नी गौरी म्हणजेच भूमी पेडणेकरसोबत त्याचं आजिबात जमत नाही. त्याची एक मैत्रीण सुक्कू म्हणजेच कियारा अडवाणी. गोविंदाचा सावत्र भाऊ आहे. त्या दोघांमध्ये एका बंगल्यावरुन वाद आहेत. दोघांनाही हा कोट्यवधींचा बंगला हवा आहे दरम्यान, प्रेयसी आणि पत्नीमध्ये अडकलेल्या गोविंदाच्या पत्नीचा खून होतो. गौरीचा खून कोणी केला, बंगला कोणाला मिळणार? आणि पुढे काय होणार यासाठी तुम्ही हा चित्रपट हॉटस्टारवर पाहू शकता.

अभिनय - गोविंदाच्या व्यक्तिरेखेत विकी कौशल खूप चांगला दिसून आला आहे. पंजाबी विकीनं एका मराठी मुलाची व्यक्तिरेखा खूप छान पद्धतीनं साकारली आहे.  विकीने या व्यक्तिरेखेची देहबोली खूप छान पकडली आहे. तो तुम्हाला बऱ्याचदा हसवतो तर अनेकदा बिचारा वाटतो.  विकीचं हे एक वेगळंच पात्र आहे आणि त्याने ते चांगलं निभावलंय.. कियाराने विकीच्या मैत्रिणीचं पात्र खूप छान साकारलंय. तिच्या नकारात्मक छटाही सिनेमात येतात.  विकीच्या शिव्या देणार्‍या बायकोच्या पात्रात भूमी पेडणेकर जरा वरचढ दिसते. विकीच्या आईच्या व्यक्तिरेखेत रेणुका शहाणेने अप्रतिम काम केले आहे. अर्धांगवायू झालेल्या आईचे हे पात्र तिनं छान साकारलं आहे. संपूर्ण फिल्ममध्ये ती व्हील चेअरवर आहे.  

दिग्दर्शन - चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. शशांकचे दिग्दर्शन चांगले आहे... चित्रपट चांगल्या गतीने पुढे जातो, सिनेमात बरेचशे ट्विस्टही येतात... तुम्हीही हसाल पण तुम्हाला सिनेमा पाहताना 70 आणि 80 च्या दशकातील सिनेमा पाहतोय की काय असं कुठेतरी जाणवेल.  चोर, पोलीस आणि एकमेकांभोवती गुरफटलेली पात्र. अशी एकंदरीत कथा आहे. 

हा सिनेमा म्हणावा तितका ग्रेट नाही.  तुम्हाला यात काही नवीन सापडणार नाही. पण जर तुम्हाला टाईमपाससाठी आणि निव्वळ मनोरंजन करायचे असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. विकी कौशल, कियारा आणि भूमी यांचे चाहते असाल तर एक चाहता म्हणून आपल्याला हा सिनेमा पाहताना आनंद मिळेल. बाकी जे लोक फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पाहतात, त्यांना हा चित्रपट आवडेल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Embed widget