Troll Movie Review: आक्राळ विक्राळ क्रियेचर 'ट्रोल'
कंटाळा आला असेल आणि किंग काँग (King Kong), गॉडझिला (Godzilla), हेलबॉण्ड (Hellbound) अशा महाकाय क्रियेचर्सला मिस करत असाल, तर तुम्ही 'ट्रोल' (Troll) या डोंगरातील मॉन्स्टरचा हा चित्रपट पाहू शकता.
Roar Uthaug
Ine Marie Wilmann,Kim Falck,Mads Sjogard, Pettersen
Troll Movie Review: अलीकडे बरेच ऐतिहासिक, अॅक्शन सिनेमे आले. साऊथच्या सिनेमांनी तर संपूर्ण वर्ष गाजवलं म्हणता येईल. काही दिवसांत 'अवतार' सुद्धा प्रदर्शित होणार आहे. अशातच नुकताच नेटफ्लिक्सचा बिग बजेट सिनेमा 'ट्रोल' ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. कंटाळा आला असेल आणि किंग काँग (King Kong), गॉडझिला (Godzilla), हेलबॉण्ड (Hellbound) अशा महाकाय क्रियेचर्सला मिस करत असाल, तर यात भर घातली आहे ती 'ट्रोल' (Troll) या डोंगरातील मॉन्स्टरने. लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून आत्तापर्यंत रोअर उथौग (Roar Uthaug) यांनी जवळपास 13 सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे यात Tomb Raider, Mammon, The Wave, Cold Prey सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असं म्हणता येईल.
नॉर्वेच्या 'ट्रोल'(Troll) बद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला हा सिनेमा पाहण्यासाठी फक्त दीड तासांचा वेळ द्यावा लागणार आहे. अर्थात नेटफ्लिक्सचा सिनेमा आहे आणि तो नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत पाहायला उपलब्ध असून, याचं हिंदी डबिंग बऱ्यापैकी चांगलंच असून, तुम्ही फॅमिली, लहान मुलांसह चित्रपट पाहू शकता. जास्त स्पॉयलर न देता सिनेमाच्या कथानक विषयी बोलूया.. तर, सिनेमाची गोष्ट नोरा टिडमॅन या पात्राच्या अवतीभवती फिरते. नोरा ही पंतप्रधानांची वैज्ञानिक सल्लागार असल्याचं पाहायला मिळतं. पुरातन काळातल्या डायनोसॉर सदृश मोठमोठ्या प्राणांच्या जीवाश्म, आणि त्यांच्या संशोधनाचं काम नोरा करताना पाहायला मिळते.
अचानक सरकारकडून तिला बोलवण्यात येतं कारण त्यांच्या शहरात मोठा मॉन्स्टर फिरतोय आणि नक्की तो कोण आहे, KING KONG आहे की, गॉडझिला की, मोठा दानव रक्षण? हे माहिती करून घ्यायला नोराची मदत सरकार घेणार असतं. तो विक्राळ प्राणी नेमका कोण आहे? का आला? कुठून आला, त्याच्याशी सामना कसा करायचा या सगळ्या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्याला थांबवायचं कसं, हे सारं जे काही घडतं ते समजण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहायला हवा.
तुम्ही या आधी किंग काँग, गॉडझिला पाहिला असेल आणि तशातच जबरदस्त अॅक्शन, ती भव्यदिव्यता पाहायची सवय असेल, तर त्या सर्व प्रेक्षकांसाठी हा सिनेमा बिलकुल नाहीये.. ते नक्कीच निराशा होऊ शकतात. मात्र, तुम्ही असे महाकाय क्रियेचर सिनेमे कधीही पाहिले नसतील, तर या सिनेमाची कथा, साहसदृश्य हे सगळं तुम्हाला आवडेल यात शंका नाही.
सिनेमाची कथा ही टिपिकल आहे, निसर्ग आणि मानव यांचा संघर्षाची कहाणी... पुन्हा तेच ते आणि दऱ्या खोऱ्यात लपलेला श्रापित क्रियेचर असतो, VFX सिनेमॅटोग्राफी, त्या क्रियेचरचं आक्राळ विक्राळ रूप सुंदरतेने साकारलं आहे, सिनेमातील अॅक्शन सीन्स जबदरस्त आहेत, हा 'ट्रोल' (Troll) नेमका कसा आहे, कोण आहे, त्याचा इतिहास, त्याच्या कथा या सगळ्या बाबत उत्कंठा लागून राहते, ज्यामुळे तुम्हाला हा सिनेमा शेवटपर्यंत तुमची खुर्ची सोडू देणार नाही.
सिनेमातील पात्रांविषयी जास्त भाष्य केलं गेलेलं नाहीये. ती उलगडली गेलेली नाहीयेत. केवळ नोरा आणि तिच्या वडिलांचं नातं सोडलं तर... यापलीकडे इतर पात्रांच्या बद्दलची माहिती अधिक रंगवता आली असती, तर नक्कीच सिनेमाची सिरीज, ट्रोलचा इतिहासात पुढे पाहायला आवडला असता. सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा सुंदर आहे. सिनेमा बद्दल जास्त काही सांगायची गरज नाहीये.. पुन्हा एकदा सांगतो की, तुम्ही किंग काँग पाहिला नसेल, तुम्हला छोटा टाईमपास सिनेमा पाहायची ईच्छा असेल 'ट्रोल' पाहायला हरकत नाही. मी या 'ट्रोल'ला देतोय 3 स्टार!
वाचा इतर चित्रपटांचे रिव्ह्यू:
Vadh Review: हा थ्रिलर चित्रपट पाहताना स्क्रिनवरुन नजर हटणार नाही, संजय मिश्रा यांचा दमदार अभिनय