एक्स्प्लोर

Citadel Honey Bunny Review : स्पाय अ‍ॅक्शनचा जबरदस्त खेळ, का पाहावी 'Citadel Honey Bunny' सीरिज?

Citadel Honey Bunny Review : हळूहळू ही सीरिज तुम्हाला आपल्या कवेत घेते. मग अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाचा योग्य डोस तुम्हाला मिळतोय.

Citadel Honey Bunny Review : या  सीरिजच्या एका दृश्यात, केके मेननने वरुण धवनला जळलेलं चिकन खायला देतो, आजकाल प्रेक्षकांचीही अशीच अवस्था आहे. हल्लीच्या सिनेमांच्या आशयामुळे चव खराब झाली आहे. पण ही सीरिज आशयाची चव सुधारण्यास मदत करु शकते.ॲक्शनचा डोस आहे, वरूण धवन सिंघम ठरलाय आणि सामंथा लेडी सिंघम ठरलीये. राज आणि डीके यांनी मिळून एक अप्रतिम भूल भुलैया तयार केला आहे, ज्यामध्ये थ्रिल, इमोशन, ॲक्शन आणि भरपूर मनोरंजन आहे.

कथा

वरुण धवन नायक बॉडी डबल बनून चित्रपटांमध्ये स्टंट करतो, तो एक स्ट्रगलिंग अभिनेत्री सामंथाला भेटतो. वरुण तिला एक छोटासा टास्क देतो ज्यामध्ये तिला एका व्यक्तीला 20 मिनिटे त्याच्या बोलण्यात गुंतवून ठेवायचे असते. हे काम करताना समंथा एका वेगळ्या जाळ्यात अडकते.मग तिला कळतं की वरुण कुणीतरी वेगळाच आहे आणि मग दोन एजन्सींमध्ये युद्ध सुरू होतं. कथेविषयी अधिक सांगणे योग्य नाही, फक्त हे जाणून घ्या की हा प्रियंका चोप्राच्या सिटाडेलचा प्रीक्वल आहे, प्रियांकाच्या नादियाच्या पात्राचे बालपण यात दाखवण्यात आले आहे.

कशी आहे सीरिज?

जेव्हा ही सीरिज सुरु झाली तेव्हा असं वाटलं की, हे काय चाललंय. कधी फ्लॅशबॅकमध्ये, कधी वर्तमानात तर कधी दुसरीकडे पण नंतर हळूहळू ही सीरिज तुम्हाला आपल्या कवेत घेते. मग अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाचा योग्य डोस तुम्हाला मिळतोय. त्याची मज्जा तुम्हाला येते. जबरदस्त अॅक्शन आहे, ट्विस्ट आणि टर्न तुम्हाला हैराण करतील,  जे काही घडते ते आधीच माहीत आहे, इथे नायक नेहमी मारत नाही, मारतो, हरतो, अगदी रडतो त्यामुळेच तुम्ही या सीरिजसोबत कनेक्ट होऊ शकता. इथे नायकाची ग्रँड एंट्री नाही पण जेव्हा ती होते इथे नायकाची ग्रँड एंट्री नाही पण जेव्हा ती घडते तेव्हा त्यात रंग भरतो. राज आणि डीकेमुळे त्या छोट्या मुलासाठी हृदय पिळवटून जातं. या सीरिजचे एकूण 6 भाग आहेत. प्रत्येक भाग 40 ते 50 मिनिटांचा आहे. 

अभिनय-वरुण धवनचे काम अप्रतिम आहे. ह्याने अशी एन्ट्री घेतली, अशी अॅक्शन केली यावरुन हिरोचं प्रमोशन केलं जातं. पण वरुणने इथे जे केले आहे त्याला प्रमोशनची गरज नाही, तो खरा वाटतो. ॲक्शन उत्तम करतो, भावनिक सीनमध्येही परफेक्ट आहे आणि केके मेननसोबतचे त्याचे सीन्स अप्रतिम आहेत. ही सीरिज तुम्हाला सांगते की, समंथाला एवढ्या मोठ्या उंचीची नायिका का म्हटलं जातं. तिच्यामुळे ही सीरिज एका वेगळ्या उंचीवर जाते. तिच्या मुलीसोबतचे तिचे सीन्स अप्रतिम आहेत. ती एवढ्या नियंत्रित पद्धतीने ॲक्शन करते की मोठे नायकही अयशस्वी होतात

तिची स्क्रीन प्रेझन्स एकाच लेव्हलचाआहे. केके मेनन एक अप्रतिम अभिनेता आहे. जिथे त्याचे नाव येईल तिथे त्याची हमी असते चांगला कंटेंट, इथेही तो बाबाच्या पात्राला जीवदान देतो, जशी जळलेलं चिकन तिला खायला देऊन तिच्या खोट्या बायकोची ओळख करून देतो, तेव्हा तो खोटं बोलतोय यावर प्रेक्षकांचाही विश्वास बसत नाही. बाल कलाकार काशवी मजमंदर. छोट्या नादियाच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे, ही मुलगी तुम्हाला भावूक करते आणि सरप्राईजही देते. साकिब सलीमचे काम खूप चांगले आहे, तो या भूमिकेत एकदम सेटल आहे, सिकंदर खेर चांगला आहे, सोहम मजुमदार, शिवंकित परिहार, सिमरन. बग्गा, सर्वांचे काम चांगले आहे. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेत परिपूर्ण आहे.

दिग्दर्शन

राज आणि डीकेचे दिग्दर्शन चांगले आहे. त्यांनी सीता आर मेननसोबत ही सीरिज लिहिली आहे.  राज आणि डीके तयारीशिवाय काही करत नाहीत हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. इथेही त्यांची तयारी दिसून येते.  कलाकारांची निवड अप्रतिम आहे, त्यांनी कथा 6 एपिसोड्समध्ये कंडेन्स केली हे देखील चांगले आहे. नाहीतर आजकाल 8 किंवा 9 भाग जबरदस्तीने बनवले जातात. एकंदरितच हा सीरिज न पाहण्याचं एकही कारण तुमच्याकडे नाही. 

रेटिंग - 3.5 स्टार्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget