LIVE BLOG : सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला आग्रह : बाळासाहेब थोरात

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. गलिच्छ राजकारणामुळे अस्वस्थ होत अजित पवारांनी राजीनामा दिल्याचा शरद पवारांचा दावा, तर अजितदादांनी मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिल्याचीही माहिती
2. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाही, गृहकलहामुळं अजितदादांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन, माझाचं शब्द अंतिम असल्याच पवारांकडून स्पष्ट
3. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, शदर पवार मात्र बैठकीला गैरहजर.
4. निवडणुकीच्या तोंडावर लक्ष वेधण्यात पवार यशस्वी, ईडीच्या विनंतीनंतर चौकशीला जाण्याचा निर्णय पवारांकडून रद्द, राष्ट्रवादीचा इव्हेंट असल्याची भाजपची टीका
5. भारतानं जगाला बुद्ध दिला युद्ध नाही, संयुक्ता राष्ट्राच्या व्यासपीठावरून मोदींकडून पाकला सूचक इशारा, भारताच्या कामगिरीचाही पंतप्रधानांनी वाचला पाढा
6. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या बेस्ट ऑफ लता पुस्तकाचं अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन, तर आज दिवसभर एबीपी माझावर सुरेल कार्यक्रमांची मेजवानी























