एक्स्प्लोर
रायगडमधील पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 32 जणांचा मृत्यू

1/6

2/6

दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरु असलं तरी पोलादपूर घाटातील वाहतुकीवर सध्या तरी सुरळीत आहे.
3/6

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.
4/6

धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक-वाहक असे एकूण 40 जण असल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र स्थानिक शिवसेना आमदार यांनी या बसमध्ये 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एबीपी माझाला दिली.
5/6

दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला. बसमध्ये 38 कर्मचारी होते, त्यात महिला कर्मचारी नव्हत्या, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.
6/6

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला.
Published at : 28 Jul 2018 02:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
