LIVE BLOG | यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के

Background
1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम, नांदेडच्या योगगरु रामदेव बाबांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी
2. एमएमआरडीएचं अधिकारक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एमएमआरडीएच्या अंतर्गत ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश, विकासकांमांना गती मिळणार
3. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर संख्यानामाच्या वादानंतर समिती स्थापन करण्याचाही निर्णय
4. अखेर मान्सून महाराष्ट्रात धडकला, वरूणराजा कोकणात दाखल झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर, 25 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार
5. लोकसभेत आज तिहेरी तलाक विरोधी विधेयक सादर होणार, तीन तलाक आणि हलाला प्रथा हद्दपार करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांचं अभिभाषणातून आवाहन
6. टीम इंडियाला दुखापतींमुळे तिसरा धक्का, नेट प्रॅक्टीस दरम्यान विजय शंकरच्या तळपायाला दुखापत, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता























