नागपुरातील हुडकेश्वर नाला भागातून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तर नागपूर शहर आणि जिल्ह्यातील 135 जणांना वाचवण्यात आलं. पावसामुळे अडकून पडलेल्या आदर्श संस्कार विद्यालयाच्या 450 विद्यार्थ्यांना सुखरुप वाचवण्यात आलं.
2/6
विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर उद्या नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
3/6
दरम्यान, सकाळपासून झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे.
4/6
आकडेवारी पाहता नागपुरात 24 तासात 61.7 मिमी पाऊस झालाय. तर गेल्या तीन तासात तब्बल 162.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या 24 तासात हवामान विभागाने नागपुरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
5/6
नागपूर : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यंदा खास नागपुरात घेण्यात येत आहे. मात्र, रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अधिवेशनाचा आजचा दिवस पाण्यात गेल्याचं पाहायाला मिळालं. कारण, साचलेल्या पाण्यामुळे विधीमंडळ परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं.
6/6
त्याचबरोबर विधानभवनातील बत्तीही काहीकाळ गुल झाली. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं.