By :
एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Mar 2019 11:55 PM (IST)
21:45 PM (IST) • 27 Mar 2019
मुंबईसह कोकणातील एकूण 12 जागांपैकी शिवसेनेचे 7 उमेदवार विजयी होतील, भाजपला 3 जागा मिळतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता येईल
23:54 PM (IST) • 27 Mar 2019
हिंगोली : शिवसेना पक्षाकडून 2009 हिंगोलीचे खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर हिंगोली लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
, तर शिवसेनेचे हेमंत पाटील यांनीदेखील लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आजी-माजी शिवसैनिकांमध्ये हिंगोली लोकसभेसाठी टक्कर होणार आहे.
21:33 PM (IST) • 27 Mar 2019
भिंवडीची जागा काँग्रेसला मिळेल तर रायगडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल.
23:53 PM (IST) • 27 Mar 2019
सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादन धोक्यात , सध्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण ढगाळ दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी अतिशय तुरळक पाऊस पडून गेला आहे. अशा या ढगाळ व पावसाळी सदृश्य वातावरणात आंबा काजू पिकांची कीड व रोगापासून विशेष काळजी घ्यावी आणि फळ संशोधन केंद्राने जाहीर केलेल्या उपाय योजना करावी असे आवाहन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी केले आहे.
19:39 PM (IST) • 27 Mar 2019
लोकसभा निवडणूक-2019 :
छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध :-
लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीअंती लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघात 16, रामटेक मतदार संघात 21, नागपूर मतदार संघात 33, भंडारा-गोंदिया मतदार संघ- 23, गडचिरोली- चिमूर मतदार संघात 6, चंद्रपूर मतदार संघात 17 आणि यवतमाळ- वाशीम मतदार संघात 31 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.