LIVE BLOG | लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसे-राष्ट्रवादीची एकत्र सभा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राज ठाकरेंची तोफ राष्ट्रवादीच्या मंचावरुन धडाडण्याची शक्यता
2. निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, लोकसभा लढवण्याबाबत मात्र सस्पेन्स कायम
3. घोटाळ्याच्या आरोपांच्या कचाट्यात अडकलेल्या पंकजा मुंडेंचा पाय खोलात, पोषण आहाराचं 6 हजार कोटींचं कंत्राट सुप्रीम कोर्टाकडून रद्द
4. अहमदनगर लोकसभेच्या जागेबाबत राहुल गांधी लक्ष घालणार, सोमवारी दिल्लीत बैठक, काल सुजय विखे आणि गिरीश महाजनांचा एकत्र हेलिकॉप्टर प्रवास
5. आकाश अंबानी-श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, बॉलिवूड, क्रिकेट, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी, सेलिब्रिटीजचे ठुमके
6. मोहालीत आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चौथा वन डे सामना, टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर, धोनीला पुढील दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती























