World Tourism Day 2024: मन उनाड झालंया..! जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारतातील 'या' ठिकाणांना भेट द्या, सौंदर्य तुम्हाला मोहून टाकेल!
World Tourism Day 2024: आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जागतिक पर्यटन दिनानिमित्त सहलीची योजना आखू शकता.
World Tourism Day 2024: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला प्रवास करावासा वाटतो. रोजचा कामाचा ताण, बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा परिणाम, व्यायामाचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे माणसाचे जीवन अगदी तणावपूर्ण झालंय. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखाद्या खास दिवसाची वाट पाहत असाल, तर या आगामी जागतिक पर्यटन दिनी म्हणजेच 27 सप्टेंबरला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीची योजना आखू शकता. हा दिवस प्रवासासाठी अतिशय चांगला आहे, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही जागतिक पर्यटन दिनानिमित्त तुमच्या मित्रांसोबत सहलीची योजना आखू शकता.
कन्याकुमारी - चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले ठिकाण
कन्याकुमारी भारताच्या तामिळनाडू राज्यात आहे. कन्याकुमारीच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे. हे ठिकाण चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. येथील दृश्यही अतिशय सुंदर आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त तुम्ही मित्रांसोबत या ठिकाणी येऊ शकता.
दार्जिलिंग - डोंगरांची राणी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त तुम्ही मित्रांसोबत भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंगला जाऊ शकता. हे ठिकाण सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. दार्जिलिंगला डोंगरांची राणी असेही म्हणतात. येथे तुम्ही 4-5 दिवस मित्रांसोबत भेट देण्याची योजना करू शकता.
काश्मीर - भारतातील स्वर्ग
काश्मीरच्या सौंदर्यामुळे काश्मीरला भारतातील स्वर्ग म्हटले जाते. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येथील सुंदर दऱ्या अतिशय आकर्षक आहेत, जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण या ठिकाणाला भेट दिली पाहिजे.
उत्तराखंड - अध्यात्मिक आणि नैसर्गिक दृश्य
उत्तराखंड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील अध्यात्मिक आणि नैसर्गिक दृश्य अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथे जाऊ शकता.
लेह - बर्फाची चादर पसरलेले ठिकाण
लडाखची राजधानी लेह हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उन्हाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच वाढते, कारण आजूबाजूला बर्फाची चादर पसरलेली असते. जागतिक पर्यटन दिनानिमित्त तुम्ही तुमच्या मित्रांसह या ठिकाणी येऊ शकता.
मेघालय - एकदा नक्की भेट द्या
भारताचे पूर्वेकडील राज्य मेघालय हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. जर तुम्ही भेट देण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. तुम्ही इथे एकटे किंवा मित्रांसोबत जाऊ शकता.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: काय महिमा वर्णू तिचा हो! इथे देवीच्या मूर्तीला चक्क घाम फुटतो, भारतातील अनोखे शक्तीपीठ, नवरात्रीनिमित्त घ्या दर्शन
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )