एक्स्प्लोर

World Environment Day 2022 : गृहोपयोगी वस्तूंची तुमची निवड आणि त्यांचा काळजीपूर्वक वापर करून करा वसुंधरेचे संरक्षण

World Environment Day 2022 : इंडिया एनर्जी आउटलूक अहवालानुसार, मुख्यतः वाढलेले उत्पन्न आणि जीवनमान सुधारणे याचा परिणाम म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा वापरणारा देश आहे.

World Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम 'Only One Earth' अशी आहे. आज, घरगुती उपकरणे आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करतांना आपली आणि आपल्या प्रियजनांची दैनंदिन कामे खूप सुलभ करत आहे. या उपकरणांमुळे जी सुविधा पुरविली जाते त्यांच्या मागे ही उपकरणे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संसाधनांव्यतिरिक्त ऊर्जा किंवा पाणी यासारख्या स्त्रोतांचा अखंड वापर असतो. हे लक्षात घेता उपकरण उत्पादक आणि ग्राहकांसाठी शाश्वत उपकरणांचे उत्पादन आणि उपकरणांच्या वापराला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे हस्तक्षेप क्षेत्र बनले आहे. 

इंडिया एनर्जी आउटलूक अहवालानुसार, मुख्यतः वाढलेले उत्पन्न आणि जीवनमान सुधारणे याचा परिणाम म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा वापरणारा देश आहे. भारताची लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे आणि पायाभूत सुविधा विकसित होत असताना उत्पन्नाची पातळीही वाढत आहे. याचा थेट परिणाम हवामान संकटावर होऊन आपल्या देशावर तसेच संपूर्ण जगावर होईल. अशा वेळी आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल उपकरणांच्या वापराला सुरुवात करून सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. 

या संदर्भात गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी असे म्हणतात की, आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी आज हरित पर्याय स्वीकारायला हवेत आणि पृथ्वीवरील संसाधनांच्या आपल्या अविवेकी वापराचा थेट परिणाम म्हणून सारे जग तोंड देत असलेल्या हवामान संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. 

शीतलतेची जबाबदारी

ग्राहकांसाठी जीवन सुकर बनवणाऱ्या विविध उपकरणांमध्ये पर्यावरणावर सर्वात मोठा ठसा उमटविणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर आणि म्हणूनच शाश्वतता-उन्मुख कृतीसाठी प्रथम याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील तापमान वर्षानुवर्षे वाढत असल्याचे सर्वसामान्य निरीक्षण आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये 45 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली. 

खोलीतील तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक एसी त्याच्या वातानुकूलन प्रणालीमध्ये काही रेफ्रिजरंट वापरतो. बर्‍याच ग्राहकांना माहित नसते की, या रेफ्रिजरंट्सचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. बहुतेक ब्रँड्सने ओझोन फ्रेंडली रेफ्रिजरंट्सवर स्विच केले असताना, ग्राहकांनी त्यांच्या एसीमध्ये वापरल्या जाणार्‍या रेफ्रिजरंटच्या ग्लोबल वार्मिंग क्षमतेची (GWP) जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. GWP फक्त 3 असलेला आर 290 हा सर्वात पर्यावरणपूरक एसी रेफ्रिजरंट आहे, त्यानंतर आर 32 डीस्टंट 675 GWP आहे. काही ब्रँडद्वारे वापरल्या जाणार्‍या आर410a सारख्या इतर रेफ्रिजरंट्समध्ये 1800 किंवा त्याहून अधिक प्रतिकूल GWP असतो.

रेफ्रिजरेटर्स देखील रेफ्रिजरंट वापरतात आणि सामान्यतः वापरल्या जाणार्‍या आर 600a मध्ये GWP कमी म्हणजे ३ असतो. थर्मो इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासारखे प्रगत कूलिंग तंत्रज्ञान आहे जे ० GWP सह पूर्णपणे रेफ्रिजरंट फ्री आहे. सध्या लहान कूलिंग सोल्यूशन्समध्ये याचा वापर होतो. हे बेडरूम, स्वयंपाकघर, लिव्हिंग रूम किंवा ऑफिससाठी अतिरिक्त थंड उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. 

ऊर्जा बचत वैशिष्ट्ये

कोणत्याही मोठ्या उपकरणाच्या खरेदीसाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक आवश्यक असतेच. पण त्याही पुढची गोष्ट म्हणजे ही उपकरणे काम करत असतात तोपर्यंत ती चालू ठेवण्यासाठीची किंमतही ग्राहकालाच मोजावी लागत असते. भारत सरकारने आपल्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी रेजिम अंतर्गत ऊर्जा रेटिंग प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन यांसारख्या घरगुती उपकरणांना त्यांच्या वीज वापरावर आधारित 1 स्टार ते 5 स्टार अशी रेटिंग देते. जितके उच्च रेटिंग तितका ऊर्जा वापर कमी असतो. म्हणून, ग्राहकांनी उपकरणांचे स्टार रेटिंग पहाणे आवश्यक आहे आणि त्यापलीकडे अधिक कार्यक्षम पर्याय निवडण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता रेटिंगचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एअर कंडिशनर्स जास्तीत जास्त ऊर्जेचा वापर करतात आणि युनिट्समधील अंदाजे वीज वापराशी एसी​​ची ऊर्जा कार्यक्षमता मोजण्यासाठीचे गुणोत्तर एनर्जी लेबल तपशील ISEER (इंडियन सीझनल एनर्जी एफिशिएन्सी रेशो) वर असतात. 

पाणी हा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. पाणी जरी विपुल प्रमाणात उपलब्ध असले तरी आपण त्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी विवेकपूर्ण वापर सुनिश्चित करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. अनेक घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणे पाण्यावर अवलंबून आहेत जसे की वॉशिंग मशीन आणि अगदी अलीकडील डिशवॉशर. ग्राहकांनी ही यंत्रे वापरताना इको-फ्रेंडली मोडचा अवलंब करावा, उदाहरणार्थ इको मोड जो आपोआप पाणी, ऊर्जा आणि वेळ समायोजित करते आणि कमी उर्जेचा वापर सुनिश्चित करते. 

वस्तू खरेदी करताना करा योग्य विचार

  • उपकरणे खरेदी करतांना पर्यावरणीय दृष्टीने विचार केला पाहिजे. तसेच जाणीवपूर्वक त्या वस्तूंचा वापर केला पाहिजे.     
  • विद्युत उपकरणे वापरून झाल्यानंतर लगेच बंद करणे ही आपली जबाबदारी आहे.
  • उपकरणे केवळ स्टँडबाय मोडमध्ये ठेवणे नव्हे तर प्लग पॉईंटवर बंद करणे, अनावश्यक वापर टाळणे, नियमित देखभाल तपासणे इत्यादी गोष्टी करायला हव्यात.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget