एक्स्प्लोर

4th June 2022 Important Events : 4 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.

4th June 2022 Important Events : जून महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 जून चे दिनविशेष.

1936: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 
 अभिनेत्री नूतन बहल यांची आज जयंती. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात 4 जून 1936 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील कुमारसेन निर्माते, दिग्दर्शक होते तर आई शोभना अभिनेत्री होत्या. नूतन यांनी वयाच्या 9व्या वर्षी बालकलाकार म्हणून कुमार समर्थ यांच्या नलदमयंती चित्रपटात काम केले होते.  1950 मध्ये त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच “हमारी बेटी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 11 ऑक्‍टोबर 1959 रोजी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहलशी त्यांनी विवाह केला. 1955 मधे सीमा या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअर ऍवार्ड मिळाले. त्यांना एकूण 6 वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना वर्ष 1974 मधे पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांचे कर्करोगाने 21 फेब्रुवारी 1991 रोजी मुंबई येथे निधन झाले.

1946: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म 
एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन, सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. त्यांचे पिता हरिकथा निरुपणकार होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला. शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गंगाई अमरन,इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत. 
 
1947: विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 

आपल्या चेहऱ्यावरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल चार  दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून विनोदी अभिनेते अशोक सराफ यांनी राज्य केले. अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खट्याळ प्रियकर असो किंवा अगदी  वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबई मध्ये झाला. त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे. परंतु, दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले.  

1904 : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म 

भगत पूरण सिंग यांचा जन्म 4 जून 1904 मध्ये पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील राजेवाल (रोहनो) येथे झाला. हिंदू कुटुंबात जन्माला आल्याने त्यांना लहानपणी रामजी दास हे नाव देण्यात आले. पुढे लहानपणीच त्यांनी शीख बनण्याचा निर्णय घेतला. ते लेखक,  प्रकाशक, एक पर्यावरणवादी होते. 
 
1974 : भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
 
1738: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)

1910 : होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1999)
 
1995: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)

1975 : अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म 

1990 : भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

1947: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन.  
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासकआणि मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. 
 
1998 : इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

1962 : अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

महत्वाच्या घडामोडी 

1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
 
1876 : ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
 
1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
 
1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
 
1944 : दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
 
1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 
1979 : घानामधे लष्करी उठाव.
 
1993 : आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
 
1994 : वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
 
1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
 
1997 : इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
 
2001 : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget