World Chocolate Day : खरंच चॉकलेट आरोग्यासाठी चांगले आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
World Chocolate Day 2022 : तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेटचे फक्त तोटेच नाही तर त्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदेही आहेत.
World Chocolate Day 2022 : तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी खा, कोल्ड कॉफी प्या, वॅनिला आईस्क्रीम खा किंवा अगदी साधं दूध प्या या सगळ्यात किंचित चॉकलेट घातलं तर त्या पदार्थाची चव आणखीनच जीभेवर रेंगाळू लागते. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेटचे फक्त तोटेच नाही तर त्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदेही आहेत तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. आज जागतिक चॉकलेट दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी डार्क चॉकलेटचे काही आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.
डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे :
1. न्यूट्रीशनने परिपूर्ण
चांगल्या क्वालिटीचे डार्क चॉकलेट तसेच त्याबरोबर उच्च कोको सामग्रीसह बनवलेले चॉकलेट चवीलाही छान लागते. यामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळते. जसे की, आयर्न, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशियम, झिंक. फॅटी अॅसिडमधून मिळणारे कोको आणि डार्क चॉकलेटसुद्धा आरोग्यासाठी चांगले असतात.
लक्षात ठेवा : जरी डार्क चॉकलेटचे फायदे असले तरी अतिप्रमाणात चॉकलेटचे सेवन करणे टाळावे. यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. याऐवजी तुम्ही शुगर-फ्री चॉकलेट्स खाऊ शकता.
2. उच्च प्रतीचे अॅंटिऑक्सिडेंट्स
डार्क चॉकलेट्समध्ये नैसर्गिक सेंद्रिय संयुगे (Organic Compounds)आढळतात. जे अॅंटिऑक्सिडेंट्सचे कार्य करतात. यामध्ये पॉलिफेनॉल यांसारखे घटक आढळतात. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कोको आणि डार्क चॉकलेटमध्ये अॅंटीऑक्सिडेंटचे प्रमाण, पॉलिफेनॉल यांसारखे अनेक घटक आढळतात.
3. चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवते
डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या हृदयाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. एका अभ्यासानुसार, कोको पावडर लक्षणीयरित्या पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
लक्षात घ्या :
जर तुम्हाला डायबिटीस, हार्टचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा.
4. तुमची त्वचा निरोगी राहते
अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, डार्क चॉकलेट तुमच्या स्किनसाठीसुद्धा फायदेशीर ठरते. यामुळे सूर्याच्या उष्णतेपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण होते. चेहऱ्यावरील रक्तपातळी वाढते. तसेच त्वचेची घनता आणि हायड्रेशनपासून बचाव होतो.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, दिवसाला 30-60 ग्रॅम चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
- Weight Loss : वजन कमी करताना करु नका 'ही' चूक, होईल नुकसान; वाचा सविस्तर
- Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )