Breastfeeding : स्तनपान करणाऱ्या महिलांनी घ्यावा 'असा' आहार; बाळ राहील निरोगी
Breastfeeding Awareness : स्तनपान करताना महिलांच्या शरीरात सामान्यतः लोह आणि कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे मुलांमध्येही या पोषक तत्वांची कमतरता असते.
Breastfeeding Awareness : ऑगस्टचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान आठवडा (Breastfeeding Week) म्हणून साजरा केला जातो. बाळाच्या आरोग्याबरोबरच आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान महत्त्वाचे आहे. मात्र, या काळात आईला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरुन आईला आणि बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
स्तनपान करताना महिलांच्या शरीरात सामान्यतः लोह आणि कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे मुलांमध्येही या पोषक तत्वांची कमतरता असते. वेळीच काळजी न घेतल्यास आई आणि बाळ दोघांनाही अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो. स्तनदा मातांनी आपल्या आहारात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घ्या.
अशक्तपणा का येतो?
स्तनपान करणा-या महिलांच्या आहारात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या पोषणाची काळजी घेतली नाही, तर त्यांना अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते. कारण स्तनपानादरम्यान कॅल्शियम आणि लोह देखील स्राव होतो. म्हणजेच दुधासोबत हे पोषक घटकही महिलांच्या शरीरातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत त्यांच्याच शरीराला योग्य आहार मिळाला नाही तर अशक्तपणाची समस्या उद्भवते.
हाडे कमकुवत होण्याची शक्यता :
केवळ अशक्तपणाच नाही, स्तनपान करताना संतुलित आणि पौष्टिक आहार शरीराला न मिळाल्यास महिलांची हाडे कमकुवत होतात. कारण दुधासोबत जे कॅल्शियम बाहेर पडतं ते त्यांच्या हाडांमधून बाहेर पडतं. याच कारणामुळे तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम नक्की घ्या.
व्हिटॅमिन-डी महत्त्वाचे का आहे?
स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी व्हिटॅमिन-डी फार महत्वाची भूमिका बजावतात. शरीरात कॅल्शियम शोषण तेव्हाच होते जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-डी योग्य प्रमाणात उपलब्ध असते. अन्यथा, तुम्ही कितीही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतले तरी, जर व्हिटॅमिन-डीची कमतरता असेल, तर शरीराला या कॅल्शियमचा पुरेपूर फायदा मिळू शकणार नाही.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी काय खावे?
स्तनपान करणाऱ्या महिलांनी नेहमीच पौष्टिक आहार घ्यावा. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, दुग्धजन्य पदार्थ तसेच घरचे अन्न खाणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात मसूर आणि दलिया यांसारख्या गोष्टींचा समावेश करा. यासोबतच जेवण केल्यानंतर अर्धा तास चहा घेऊ नका. असे केल्याने अन्नातून पोषक आणि लोहाचे शोषण कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Breastfeeding Week : स्तनपानाशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
- Health Tips : स्मरणशक्ती वाढविण्यासाठी 'या' 5 सूपरफूड्सचा आहारात समावेश करा; जाणून घ्या सविस्तर
- Diabetes Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या मधुमेहींसाठी मान्सून फिटनेस टिप्स